Virat Kohli retains No. 1 spot in ICC Test rankings, Kane Williamson ranked 2nd | आयसीसी कसोटी क्रमवारीत विराट कोहली अव्वल, केन विलियम्सन दुसऱ्या स्थानी 
आयसीसी कसोटी क्रमवारीत विराट कोहली अव्वल, केन विलियम्सन दुसऱ्या स्थानी 

लंडनः भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीनंआयसीसी कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान कायम राखले आहे. कोहलीच्या खात्यात 922 गुण आहेत. न्यूझीलंडचा केन विलियम्सन 913 गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे. या क्रमवारीत चेतेश्वर पुजारा ( 881) तिसऱ्या स्थानांवर आहे.

गोलंदाजांमध्ये ऑस्ट्रेलियाच्या पॅट कमिन्सने 878 गुणांसह अव्वल स्थान कायम राखले आहे. इंग्लंडचा जेम्स अँडरसन ( 862) आणि दक्षिण आफ्रिकेचा कागिसो रबाडा ( 851)  अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर आहेत. भारताच्या रवींद्र जडेजा आणि आर अश्विन या दोघांनी अव्वल दहामध्ये स्थान कायम राखले आहे. जडेजा सहाव्या, तर अश्विन दहाव्या स्थानावर आहे.

संघांमध्ये कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने अव्वल स्थान कायम राखले आहे. न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया हे अव्वल पाचात आहेत. अष्टपैलू खेळाडूंमध्ये भारताच्या रवींद्र जडेजानं तिसरे, तर वेस्ट इंडिजचा जेसन होल्डर आणि बांगलादेशचा शकिब अल हसन अनुक्रम पहिल्या व दुसऱ्या स्थानावर आहेत. भारतीय संघ 3 ऑगस्टपासून वेस्ट इंडीज दौऱ्यावर जाणार आहे. तेथे भारतीय संघ दोन कसोटी सामने खेळणार आहे. 


Web Title: Virat Kohli retains No. 1 spot in ICC Test rankings, Kane Williamson ranked 2nd
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.