Virat Kohli in the lane of Indore and started ... | इंदूरच्या गल्लीमध्ये अवतरला विराट कोहली आणि सुरु झालं...
इंदूरच्या गल्लीमध्ये अवतरला विराट कोहली आणि सुरु झालं...

मुंबई : भारतीय संघ सध्या इंदूरमध्ये पहिल्या कसोटी सामन्यासाठी दाखल झाला आहे. पहिल्या कसोटी सामन्याला १४ नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. त्यासाठी भारतीय संघ काल इंदूरमध्ये दाखल झाला आहे. पण आज भारताचा कर्णधार विराट कोहली हा इंदूरच्या एका गल्लीमध्ये अवतरल्याचे पाहायला मिळाले.

विराटला बांगलादेशविरुद्धच्या ट्वेन्टी-२० मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली होती. यावेळी भारताचे कर्णधारपद रोहित शर्माकडे सुपूर्द करण्यात आले होते. भारताने ही मालिका २-१ अशी जिंकली होती. नागपूर येथील सामन्यापूर्वी ही मालिका १-१ अशी बरोबरीत होती. पण भारताने नागपूरमध्ये ३० धावांनी विजय मिळवला आणि मालिका २-१ अशा फरकाने खिशात टाकली.

भारताची ट्वेन्टी-२० मालिका सुरु असताना कोहली विश्रांती घेण्यासाठी पत्नी अनुष्का शर्माबरोबर भूतान येथे गेला होता. पण आता कसोटी सामन्यासाठी तो इंदूरमध्ये दाखल झाला आहे. इंदूरमध्ये दाखल झाल्यावर कोहली श्रीजीवेली कॉलेजमध्ये शुटींसाठी आला होता. यावेळी तेथील मुलांबरोबर कोहली क्रिकेट खेळला आणि त्यांच्याबरोबर सेल्फीही काढले, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

भारत आणि बांगलादेश यांच्यातील पहिल्या कसोटीत पाऊस ठरणार का खलनायक...
मुंबई : भारत आणि बांगलादेश यांच्यातील ट्वेन्टी-२० मालिका संपलेली आहे. त्यामुळे आता साऱ्यांनाच वेध लागले आहेत. भारत आणि बांगलादेश यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याला १४ नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. हा सामना इंदूर येथे होणार असून येथे काही दिवसांपासून काळे ढग जमा झाले आहेत. त्यामुळेच पाऊस आता या कसोटी सामन्यासाठी खलनायक ठरणार का, अशी चर्चा सुरु झाली आहे.

याबाबत मैदानाचे क्युरेटर समंदर सिंह चौहान यांनी सांगितले की, " गेल्या काही दिवसांपासून स्टेडियमजवळ काळे ढग दाटून आलेले पाहायला मिळत आहेत. त्यामुळे येथे पाऊस कधीही पडू शकतो. त्यामुळे कोणतीही जोखीम न उचलता आम्ही खेळपट्टी झाकून ठेवली आहे."

Web Title: Virat Kohli in the lane of Indore and started ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.