Virat Kohli Daughter Vamika first picture, Ind Vs Sa 3rd ODI: कोहलीच्या 'लेकी'ची पहिली झलक; द.आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यावेळी अनुष्कासोबत दिसली 'वामिका'; पाहा Photo

Virat Kohli Daughter Vamika First Picture: भारत आणि द.आफ्रिकेत आज तिसरा एकदिवसीय सामना खेळवला जात आहे. भारतीय संघ प्रथम गोलंदाजी करत असून द.आफ्रिकेचा डाव सुरू असतानाच टेलिव्हिजन स्क्रीनवर एका अशा व्यक्तीचं दर्शन झालं की ज्याची प्रत्येकजण आतुरतेनं वाट पाहात होता.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2022 05:03 PM2022-01-23T17:03:49+5:302022-01-23T17:06:48+5:30

whatsapp join usJoin us
virat kohli daughter vamika first picture anushka sharma india vs south africa 3rd odi match | Virat Kohli Daughter Vamika first picture, Ind Vs Sa 3rd ODI: कोहलीच्या 'लेकी'ची पहिली झलक; द.आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यावेळी अनुष्कासोबत दिसली 'वामिका'; पाहा Photo

Virat Kohli Daughter Vamika first picture, Ind Vs Sa 3rd ODI: कोहलीच्या 'लेकी'ची पहिली झलक; द.आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यावेळी अनुष्कासोबत दिसली 'वामिका'; पाहा Photo

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Virat Kohli Daughter Vamika First Picture: भारत आणि द.आफ्रिकेत आज तिसरा एकदिवसीय सामना खेळवला जात आहे. भारतीय संघ प्रथम गोलंदाजी करत असून द.आफ्रिकेचा डाव सुरू असतानाच टेलिव्हिजन स्क्रीनवर एका अशा व्यक्तीचं दर्शन झालं की ज्याची प्रत्येकजण आतुरतेनं वाट पाहात होता. भारतीय संघाचा हरहुन्नरी फलंदाज विराट कोहलीच्या चिमुकल्या मुलीची म्हणजेच 'वामिका'ची पहिली झलक आज प्रेक्षकांना पाहायला मिळाली.

विराट कोहलीची पत्नी आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा पॅव्हेलियनमध्ये 'वामिका'ला कडेवर घेऊन उभी होती. त्याचवेळी कॅमेरा अनुष्काकडे गेला आणि वामिकाची पहिली झलक प्रेक्षकांना पाहायला मिळाली. कोहली आणि अनुष्का नेहमीच आपल्या लेकीला प्रसारमाध्यमं, फोटोग्राफर आणि प्रसिद्धीपासून दूर ठेवत आले आहेत. पण यावेळी स्टँडमध्ये आपल्या बाबांचा खेळ पाहण्यासाठी आलेल्या चिमुकल्या वामिकाला कॅमेरानं टिपलं आणि तिची पहिली झलक सर्वांना पाहायला मिळाली. 

जोपर्यंत आपल्या मुलीला सोशल मीडिया आणि इत्यादी गोष्टींची समज येत नाही तोवर तिला प्रसिद्धीपासून दूर ठेवण्याचा मानस विराट कोहली आणि अनुष्का यांनी याआधीच बोलून दाखवला होता. त्याबाबत दोघं वारंवार खूप काळजी देखील घेत असल्याचं दिसून येतं. आपल्या भोवताली घडणाऱ्या गोष्टींची समज वामिकाला आली आणि ती तिचे निर्णय घेण्यास सक्षम झाल्यानंतर आम्ही तिला अडवणार नाही, असंही कोहली म्हणाला होता. 

वामिका आता एक वर्षाची झाली आहे. भारतीय संघ जेव्हा द.आफ्रिकेविरोधात कसोटी सामना खेळत होता त्याचवेळी वामिका वाढदिवस देखील साजरा करण्यात आला होता. वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. याशिवाय केपटाऊनमध्ये जेव्हा भारतीय संघ पहिला कसोटी सामना खेळत होता. तेव्हा विराट कोहली ग्राऊंडमधून आपल्या चिमुकल्या लेकीला हातवारे करुन तिचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करत असल्याचंही पाहायला मिळालं होतं. 

Web Title: virat kohli daughter vamika first picture anushka sharma india vs south africa 3rd odi match

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.