Good News : 22 मे पासून अनुभवता येणार क्रिकेटचा Live थरार; जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

क्रिकेट चाहत्यांना तर जुन्या सामन्यांच्या हायलाईट्सवर समाधान मानावे लागत आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2020 05:21 PM2020-05-14T17:21:19+5:302020-05-14T17:23:09+5:30

whatsapp join usJoin us
Vincy Premier League T10 is scheduled to begin from May 22 at St Vincent & Grenadines svg | Good News : 22 मे पासून अनुभवता येणार क्रिकेटचा Live थरार; जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Good News : 22 मे पासून अनुभवता येणार क्रिकेटचा Live थरार; जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

कोरोना व्हायरमुळे जगभरात क्रीडा स्पर्धा रद्द झाल्या आहेत किंवा त्या स्थगित करण्यात आल्या आहेत. क्रिकेट चाहत्यांना तर जुन्या सामन्यांच्या हायलाईट्सवर समाधान मानावे लागत आहेत. इंडियन प्रीमिअर लीग ( आयपीएल), आशिया चषक आणि ट्वेंटी-20 वर्ल्ड कपवर अनिश्चिततेचं सावट अजूनही कायम आहे. पण, क्रिकेट प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. 22 मे पासून क्रिकेट स्पर्धेला सुरुवात होणार आहे. कोरोना व्हायरसचं संकट लक्षात घेऊन चेंडू चमकावण्यासाठी लाळ न वापरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सेंट व्हिंसेंट अँड ग्रेनाडीन्स क्रिकेट असोसिएशनने गुरुवारी ही घोषणा केली. 22 ते 31 मे 2020 या कालावधीत विंसी प्रीमिअर लीग ( व्हिपीएल) T10 खेळवण्यात येणार आहे. कॅरेबियन बेटावरील आर्नोस व्हॅली स्पोर्टिंग कॉम्प्लेक्सवर या T10 लीगचे सामने खेळवण्यात येतील. या लीगमध्ये 6 संघांचा समावेश असलेली ही लीग इंडियन प्रीमिअर लीग आणि कॅरेबियन प्रीमिअर लीगच्या धर्तीवर खेळवण्यात येणार आहे. या लीगमध्ये 72 खेळाडूंचा सहभाग आहे. 

क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. किशोरे शॅलोव यांनी सांगितले की,''क्रिकेट चाहत्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. या लीगच्या सामन्याला क्रिकेट चाहत्यांचा होणारा आवाज मला आतापासून ऐकू येत आहे. 10 दिवसांत 30 सामने खेळवण्यात येणार असून त्याचं थेट प्रक्षेपणही करण्यात येणार आहे.'' 

या लीगमध्ये केस्रिक विलियम्स, ओबेड मॅकॉय आणि सुनील अँब्रीस हे आंतरराष्ट्रीय खेळाडू सहभागी होणार आहेत.  

संघ, त्यांचे खेळाडू व सामन्यांचं वेळापत्रक


अन्य महत्त्वाच्या बातम्या

मोहम्मद शमीला पत्नी हसीन जहाँमुळे मोठा धक्का; यंदाही मिळणार नाही अर्जुन पुरस्कार 

Photos : विराट-अनुष्काचे मुंबईतील घर पाहिलेत का? चला करूया सफर!

 जगायचं तरी कसं? लॉकडाऊनमुळे महाराष्ट्राच्या खेळाडूवर उपासमारीची वेळ

हार्दिक पांड्याच्या रोमँटिक उत्तरानं नताशा लाजली; TikTok व्हिडीओतून व्यक्त केल्या भावना

Video : डोळ्यावर पट्टी बांधलेल्या मुलाचं फुटबॉल कौशल्य पाहा; म्हणाल क्या बात, क्या बात...

Web Title: Vincy Premier League T10 is scheduled to begin from May 22 at St Vincent & Grenadines svg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.