Video: New Zealand Kid Nailing Jasprit Bumrah's Bowling Action Impresses on social media | Video: लहानग्या बुमराहचा सोशल मीडियावर धुमाकूळ; हुबेहूब गोलंदाजी बघून तुम्ही व्हाल चकीत

Video: लहानग्या बुमराहचा सोशल मीडियावर धुमाकूळ; हुबेहूब गोलंदाजी बघून तुम्ही व्हाल चकीत

भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहमध्ये त्याच्या अद्वितीय अ‍ॅक्शन आणि यॉकरचा टिच्चून मारा करण्याची क्षमता असल्यामुळे तो लवकरच जगातील सर्वोत्कृष्ट गोलंदाजांच्या यादीत सामील झाला. ट्वेंटी 20, वन- डेसह कसोटी क्रिकेटमध्येही बुमराहने मोठ्या प्रमाणात यश संपादन केले आहे. मात्र सोशल मीडियावर देखील एका छोटा बुमराहने धुमाकूळ घातला आहे.

जसप्रीत बुमराहसारखी गोलंदाजी करण्याची अनेक युवा खेळाडू प्रयत्न करत असतात. सध्या असाच एक लहान मुलगा बुमराहसारखी गोलंदाजी टाकत असतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. न्यूझीलंडमधील स्थानिक क्रिकेट संघाचे प्रशिक्षक ऑली प्रिंगल यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये एक लहान मुलगा बुमराहप्रमाणे गोलंदाजी करत आहे.

हाच तर खरा दर्जा आहे, अशी इंग्लंडचा माजी खेळाडू जेम्स टेलर व्हिडीओ प्रतिक्रिया दिली. न्यूझीलंड क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक माईक हेसॉन यांनी देखील हा व्हिडीओ रिट्विट करत मुलाचे कौतूक केले आहे.

 

 

Web Title: Video: New Zealand Kid Nailing Jasprit Bumrah's Bowling Action Impresses on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.