Video : Mahendra Singh Dhoni becomes a farmer; Doing organic farming svg | Video : क्रिकेटपासून दूर असलेला महेंद्रसिंग धोनी बनला शेतकरी; करतोय सेंद्रीय शेती

Video : क्रिकेटपासून दूर असलेला महेंद्रसिंग धोनी बनला शेतकरी; करतोय सेंद्रीय शेती

भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या भविष्याबाबतच्या चर्चा संपता संपेना. इंग्लंडमध्ये पार पडलेल्या वर्ल्ड कप स्पर्धेनंतर धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूरच आहे. मागील सहा महिन्यांपासून धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. या कालावधीत त्यानं आपल्या कुटुंबीयांसोबत वेळ घालवला. आगामी इंडियन प्रीमिअर लीग ( आयपीएल) मधील कामगिरीवर त्याचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पुनरागमन अवलंबून आहे. आयपीएलमध्ये धोनीनं दमदार कामगिरी केली, तरच त्याला टीम इंडियात संधी मिळेल, असे संकेत टीम इंडियाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी कोही दिवसांपूर्वी दिले होते. त्यामुळे चेन्नई सुपर किंग्सच्या कर्णधाराच्या खेळाकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. 

धोनी आता आयपीएलमध्येच थेट मैदानावर उतरणार हे स्पष्ट असल्यानं आगामी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वन डे मालिकेत त्याचा संघात समावेश नसेल हेही निश्चित आहे. धोनीनं काही दिवसांपूर्वी आताच काही विचारू नका जे काही विचारायचं आहे ते जानेवारीनंतर, असं वक्तव्य केलं होतं. पण, अजूनही त्याच्या खेळण्यावर सस्पेन्स आहे. क्रिकेटपासून दूर असलेला धोनी शेतकरी बनला आहे. त्यानं त्याच्या फेसबूक वॉलवर शेती करतानाचा व्हिडीओ पोस्ट केला आहे.
पपईच्या शेतीनंतर आता सेंद्रीय कलिंगडाच्या शेतीकडे वळलो आहे. 20 दिवसांच्या कालावधीत दुसऱ्यांदा शेतात उतरून चांगले वाटत आहे. त्यामुळे उत्सुकताही तितकीच आहे. 

धोनीनं 90 कसोटी सामन्यांत 38.09 च्या सरासरीनं 6 शतकं व 33 अर्धशतकांसह 4876 धावा केल्या आहेत. 350 वन डे क्रिकेटमध्ये त्याची सरासरी ही 50.57 इतकी आहे. त्याच्या 10773 धावांत 10 शतकं व 73 अर्धशतकांचा समावेश आहे. ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये त्यानं 98 सामन्यांत 1617 धावा केल्या आहेत. यष्टिरक्षणात कसोटीत त्याच्या नावावर 256 झेल व 38 स्टम्पिंग, वन डेत 321 झेल व 123 स्टम्पिंग आणि ट्वेंटी-20त 57 झेल व 34 स्टम्पिंग आहेत. 
 

पाहा व्हिडीओ....

 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Video : Mahendra Singh Dhoni becomes a farmer; Doing organic farming svg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.