India Tour of Sri Lanka : Intra-squad सामन्यात हार्दिक, सूर्यकुमार, पृथ्वी यांची दमदार फटकेबाजी, Video

India Tour of Sri Lanka : श्रीलंकेला त्यांच्याच घरच्या मैदानावर पराभूत करण्यासाठी टीम इंडिया शिखर धवनच्या नेतृत्वाखाली कसून सराव करत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2021 05:24 PM2021-07-09T17:24:34+5:302021-07-09T17:25:25+5:30

whatsapp join usJoin us
Video : Hardik, Suryakumar, Prithvi Shaw go bonkers as SLC shares video of India's intra-squad match   | India Tour of Sri Lanka : Intra-squad सामन्यात हार्दिक, सूर्यकुमार, पृथ्वी यांची दमदार फटकेबाजी, Video

India Tour of Sri Lanka : Intra-squad सामन्यात हार्दिक, सूर्यकुमार, पृथ्वी यांची दमदार फटकेबाजी, Video

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India Tour of Sri Lanka : श्रीलंकेला त्यांच्याच घरच्या मैदानावर पराभूत करण्यासाठी टीम इंडिया शिखर धवनच्या नेतृत्वाखाली कसून सराव करत आहे. दुसऱ्या आंतर-संघ सराव सामन्यात भारतीय फलंदाजांनी जोरदार फटकेबाजी केली. १३ जुलैपासून वन डे मालिकेला सुरूवात होणार आहे. तत्पूर्वी आंतर संघ सामन्यात हार्दिक पांड्या, पृथ्वी शॉ व सूर्यकुमार यादव यांनी टोलेजंग फटकेबाजी केली. शिखर धवन एकादश आणि भुवनेश्वर एकादश अशा दोन संघांमध्ये हा सामना खेळवण्यात आला.  

पहिल्या सराव सामन्यात भुवनेश्वर एकादश संघानं धवनच्या संघावर मात केली होती. त्यात लोकेश राहुल, सूर्यकुमार यांनी अर्धशतकी खेळी केली होती. आज हार्दिक, सूर्यकुमार, पृथ्वी, ऋतुराज गायकवाड यांनी अंतिम ११साठी आपापली दावेदारी मजबूत करण्याचा प्रयत्न केला. श्रीलंका क्रिकेट बोर्डानं त्यांच्या यू ट्यूब चॅनेलवर सराव सामन्याचा व्हिडीओ पोस्ट केला आहे.  

पाहा व्हिडीओ..

भारतीय संघ  - शिखर धवन ( कर्णधार), पृथ्वी शॉ, देवदत्त पडीक्कल, ऋतुराज गायकवाड, सूर्यकुमार यादव, मनिष पांडे, हार्दिक पांड्या, नितीश राणा, इशान किशन ( यष्टिरक्षक), संजू सॅमसन ( यष्टिरक्षक), युझवेंद्र चहल, राहुल चहर, के गौथम, कृणाल पांड्या, कुलदीप यादव, वरूण चक्रवर्थी, भुवनेश्वर कुमार ( उपकर्णधार), दीपक चहर, नवदीप सैनी, चेतन सकारीया
नेट बॉलर्स - इशान पोरेल, संदीप वॉरियर्स, अर्षदीप सिंग, साई किशोर, सिमरजीत सिंग 

स्पर्धेचे वेळापत्रक

वन डे मालिका - 13, 16 व 18 जुलै, कोलंबो

ट्वेंटी-20 मालिका - 21, 23 व 25 जुलै, कोलंबो

 

Web Title: Video : Hardik, Suryakumar, Prithvi Shaw go bonkers as SLC shares video of India's intra-squad match  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.