Video: चांगला खेळला नाहीस तर घरी येऊ नकोस; ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजाला प्रेयसीचा सज्जड दम

बिग बॅश लीमगध्ये गुरुवारी ब्रिस्बेन हिट संघानं होबार्ट हरिकेन्स संघावर 5 विकेट राखून दणदणीत विजय मिळवला.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2020 04:33 PM2020-01-10T16:33:04+5:302020-01-10T16:33:31+5:30

whatsapp join usJoin us
Video: Erin Holland hilariously warns fiancé Ben Cutting, “Play well in Perth or don’t come home” | Video: चांगला खेळला नाहीस तर घरी येऊ नकोस; ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजाला प्रेयसीचा सज्जड दम

Video: चांगला खेळला नाहीस तर घरी येऊ नकोस; ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजाला प्रेयसीचा सज्जड दम

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

बिग बॅश लीमगध्ये गुरुवारी ब्रिस्बेन हिट संघानं होबार्ट हरिकेन्स संघावर 5 विकेट राखून दणदणीत विजय मिळवला. गॅबा येथे झालेल्या या सामन्यात ब्रिस्बेन हिट संघानं जिमी पिएरसन आणि अष्टपैलू बेन कटिंग यांच्या 60 धावांच्या भागीदारीच्या जोरावर हा विजय मिळवला. 127 धावांचा पाठलाग करताना ब्रिस्बेन संघाचा निम्मा संघ 71 धावांत तंबूत परतला होता. त्यानंतर पिएरसन ( 23) आणि कटिंग ( 43) यांनी दमदार खेळ करताना संघाला विजय मिळवून दिला.

Video : 2020 मधील पहिला वादग्रस्त निर्णय? तुम्हीच ठरवा फलंदाज Out की Not Out!

प्रथम फलंदाजीला आलेल्या हरिकेन्स संघाचे पाच फलंदाज 59 धावांत माघारी पाठवून हिट संघानं सामन्यावर पकड घेतली होती. कर्णधार वेड एकाबाजूनं खिंड लढवत होता. त्यानं 46 चेंडूंत 3 चौकार व 2 षटकार खेचून 61 धावांची खेळी केली. त्याला थॉमस रॉजर्स ( 17) आणि नॅथन एलिस ( 13*) यांनी छोटेखानी खेळी करून साथ दिली.  त्या जोरावर त्यांनी 9 बाद 126 धावा केल्या.

Video: पाकिस्तानी गोलंदाजाला इंग्लिश जमेना, घ्यावी लागली नेपाळच्या खेळाडूची मदत

सामना संपल्यानंतर टीव्ही अँकर एरिन हॉलंड हीनं कटिंगला प्रश्न विचारली. या सामन्यात कटिंगनं 1 विकेट आणि 29 चेंडूंत ( 3 चौकार व 3 षटकार) 43 धावांची नाबाद खेळी केली. त्यामुळे त्याला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले. त्यावेळी एरिननं ऑस्ट्रेलियन फलंदाज कटिंगला एक धमकी दिली. एरिन आणि कटिंग यांचा नुकताच साखरपुडा झाला होता. ब्रिस्बेन हिटचा पुढील सामना पर्थवर होणार आहे आणि एरिननं कटिंगला चांगलेच खडसावले आहे. 


ती म्हणाली,''या सामन्यापूर्वी मी तुला दिलेल्या शुभेच्छा कामी आल्या आणि तुझ्या बॅटीतून धावा बनल्या. त्यामुळे मला तुझ्यासोबत बोलण्याची संधी मिळाली. माझं ऐकल्याबद्दल आभारी आहे.'' एरिनाच्या या वाक्यावर कटिंगनेही तिचे आभार मानले. तो म्हणाला,''या खेळपट्टीवर धावा करणं अवघड होतं. विजयाचे श्रेय जिमीलाही द्यायला हवे. खेळपट्टीवर अनपेक्षित बाऊंसर होत होता. हा आमचा सलग चौथा विजय आहे आणि पुढील सामना पर्थवर आहे.''


त्यावर एरिन म्हणाली,''पर्थमध्ये तुला फिरायला आवडतं, हे मला चांगलंच माहित्येय. त्यामुळे आज रात्रभर जागू नकोस, आराम कर आणि पर्थमध्येही दमदार खेळी कर... असं नाही केलंस तर घरी येऊ नकोस.''
पाहा व्हिडीओ...

चर्चा तर होणारच; क्रिकेटच्या मैदानावर अवतरली 'Miss World'!

चाहत्यानं प्रश्न विचारला अन् तिनं युवराज सिंगवर फोडलं खापर, नेमकं झालं तरी काय?

Web Title: Video: Erin Holland hilariously warns fiancé Ben Cutting, “Play well in Perth or don’t come home”

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.