ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी सुर्यकुमार यादवला डावलल्याने दिग्गज भडकले

हरभजन सिंह याने बीसीसीआयवर प्रश्न उपस्थित केले आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2020 04:17 PM2020-10-28T16:17:19+5:302020-10-28T16:31:36+5:30

whatsapp join usJoin us
The veterans were outraged when Suryakumar Yadav was dropped for the Australia tour | ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी सुर्यकुमार यादवला डावलल्याने दिग्गज भडकले

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी सुर्यकुमार यादवला डावलल्याने दिग्गज भडकले

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघात मुंबई इंडियन्सचा फलंदाज सुर्यकुमार यादव याची निवड झालेली नाही. त्यामुळे भारतीय निवड समितीवर दिग्गजांनी आपला राग व्यक्त केला आहे. माजी मुख्य निवडकर्ते दिलीप वेंगसरकर, फिरकीपटू हरभजन सिंग यांनी आपला राग व्यक्त केला.

वेंगसरकर म्हणाले की, ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर निवडलेल्या भारतीय संघात मुंबई इंडियन्सचा प्रमुख फलंदाज सुर्यकुमार यादव याची निवड होऊ शकलेली नाही. मी सुर्यकुमारची निवड न झाल्याने आश्चर्यचकीत झालो आहे. तो सलग धावा करत आहे. मला माहीत नाही की संघात जागा मिळवण्यासाठी त्याला आणखी काय करावे लागेल.’ यादवची निवड न होण्यामागे काय कारण आहे. याची समिक्षा करण्याचे आवाहन देखील वेंगसरकर यांनी बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांना केले आहे.

हरभजन सिंह याने बीसीसीआयवर प्रश्न उपस्थित केले आहे.  हरभजन याबाबत म्हणाला की, मला माहीत नाही त्यांनी यादवला संघात स्थान मिळवण्यासाठी आणखी काय करावे लागेल. त्याने आयपीएल आणि रणजीच्या सत्रात चांगला खेळ केला आहे. मला वाटते की इथे प्रत्येक व्यक्तीसाठी वेगळे नियम आहेत.’

सुर्य कुमार यादव याने आतापर्यंत आयपीएलच्या या सत्रात ११ सामन्यात २८३ धावा केल्या आहेत. त्यात दोन अर्धशतकांचा समावेश देखील आहे. मुंबई इंडियन्सच्या मधल्या फळीचा तो आधारस्तंभ आहे.

Web Title: The veterans were outraged when Suryakumar Yadav was dropped for the Australia tour

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.