Trent Bolt joins Mumbai Indians | मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात ट्रेंट बोल्टचा समावेश
मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात ट्रेंट बोल्टचा समावेश

मुंबई : आयपीएलमधील चारवेळचा विजेता मुंबई इंडियन्सने आपल्या वेगवान माऱ्याला अधिक बळकटी देत न्यूझीलंडचा अनुभवी वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टला संघात निवडले. त्याचवेळी राजस्थान रॉयल्सने अंकित राजपूतची निवड केली.
आयपीएल २०२०साठीची लिलाव प्रक्रिया १९ डिसेंबरला कोलकाता येथे पार पडणार आहे. पण, तत्पूर्वी सहभागी संघ खेळाडूंची अदलाबदल करत असून बुधवारी मुंबई इंडियन्सने आपल्या ताफ्यात बोल्टला समाविष्ट केले आहे. दुसरीकडे राजस्थान रॉयल्सने अंकित रजपूतला आपल्या संघात घेतले आहे.

Web Title: Trent Bolt joins Mumbai Indians

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.