स्टोक्सच्या अनुपस्थितीत रॉयल्सपुढे खडतर आव्हान

चेन्नई सुपरकिंग्जविरुद्ध विजय मिळवायचा कसा! गत उपविजेता चेन्नई संघाने पहिल्या लढतीत गत चॅम्पियन मुंबई संघाचा पाच गडी राखून पराभव केला.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2020 05:40 AM2020-09-22T05:40:23+5:302020-09-22T05:40:33+5:30

whatsapp join usJoin us
Tough challenge for Royals in Stokes' absence | स्टोक्सच्या अनुपस्थितीत रॉयल्सपुढे खडतर आव्हान

स्टोक्सच्या अनुपस्थितीत रॉयल्सपुढे खडतर आव्हान

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

शारजा : बेन स्टोक्स स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यातून बाहेर असला तरी दुखापतग्रस्त स्टीव्ह स्मिथ पहिल्या सामन्यासाठी उपलब्ध असल्याचे वृत्त राजस्थान रॉयल्ससाठी आनंददायी ठरले आहे. असे असले तरी मंगळवारी पहिल्या लढतीत चेन्नई सुपर किंग्जचे आव्हान पेलविणे खडतर मानले जात आहे. जोस बटलर पहिल्या पहिल्या लढतीला मुकणार आहे. कारण तो आपल्या कुटुंबासह येथे वेगळा आलेला आहे. त्याला दुबईमध्ये ३६ तासांच्या अनिवार्य विलगीकरणामध्ये राहावे लागणार आहे.

गत उपविजेता चेन्नई संघाने पहिल्या लढतीत गत चॅम्पियन मुंबई संघाचा पाच गडी राखून पराभव केला.
स्टोक्स आपल्या आजारी वडिलांची सेवा करण्यासाठी न्यूझीलंडमध्ये आहे. गोलंदाजीमध्ये इंग्लंडचा जोफ्रा आर्चर व आॅस्ट्रेलियाचा अँड्यू टाय यांच्यावर जबाबदारी असेल तर धावा फटकावण्यासाठी दक्षिण आफ्रिकेच्या डेव्हिड मिलरकडून संघाला मोठ्या कामगिरीची अपेक्षा असेल. रॉयल्समधील भारतीय खेळाडूंना कामगिरीत सातत्य राखता आलेले नाही. संजू सॅम्सन, रॉबिन उथप्पा, जयदेव उनाडकट, वरुण अ‍ॅरोन यांना लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही.
दुसऱ्या बाजूचा विचार करता चेन्नईकडून सॅम कुरेनने शानदार अष्टपैलू कामगिरी करीत ड्वेन ब्राव्होची उणीव भासू दिलेली नाही.
ब्राव्हो दुखापतग्रस्त असल्यामुळे सुरुवातीला काही सामन्यांत खेळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. अंबाती रायुडू व फाफ ड्यूप्लेसिस यांना लौकिकाला साजेशी कामगिरी केली. आयपीएलमध्ये यशस्वी गोलंदाज पीयूष चावलाने त्याला करारबद्ध करण्याचा संघ व्यवस्थापनाचा निर्णय योग्य असल्याचे सिद्ध केले. जर पुढील लढतीत दीपक चाहर खेळू शकला नाही तर त्याचा पर्याय शार्दुल ठाकूर राहील.
क्रिकेट आॅस्ट्रेलियाच्या वैद्यकीय समितीने स्मिथला पहिल्या लढतीत खेळण्याची परवानगी दिल्यामुळे रॉयल्सला दिलासा लाभला. रॉयल्सच्या कामगिरीची भिस्त बºयाच अंशी विदेशी खेळाडूंवर आहे.
वेदर रिपोर्ट । वातावरण उष्ण राहणार असून रात्रीच्या सत्रात दवाचा प्रभाव राहील.
पिच रिपोर्ट । येथील खेळपट्टी सुरुवातीला वेगवान गोलंदाजांना अनुकूल व त्यानंतर फिरकीपटू वर्चस्व गाजवण्याची शक्यता.

मजबूत बाजू
चेन्नई । कॅप्टन कूल धोनीच्या साथीला अनुभवी खेळाडूंचा समावेश. अष्टपैलू सॅम कुरेनचा फॉर्म.
राजस्थान । डेव्हिड मिलरकडून मोठ्या अपेक्षा. गोलंदाजीमध्ये जोफ्रा आर्चर व अँड्य्रू टाय भेदक.
कमजोर बाजू
चेन्नई । संघातील अनेक खेळाडू प्रौढ असल्यामुळे क्षेत्ररक्षण कमकुवत. वेगवान गोलंदाजीमध्ये विविधतेचा अभाव.
राजस्थान । भारतीय खेळाडू कामगिरीत सातत्य राखण्यात अपयशी. संघाची भिस्त विदेशी खेळाडूंच्या कामगिरीवर अवलंबून.

Web Title: Tough challenge for Royals in Stokes' absence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :IPL 2020IPL 2020