IPL 2020च्या मध्यंतरानंतर तीन संघ Play Offच्या शर्यतीत आघाडीवर; CSKसह अन्य संघांना घ्यावी लागेल प्रचंड मेहनत!

Indian Premier League ( IPL 2020) चे १३वे पर्व मध्यंतरात आले आहे. सर्व संघांनी त्यांच्या वाट्यातील १४ पैकी निम्मे म्हणजेच प्रत्येकी ७ सामने खेळले आहेत. आयपीएल २०२०च्या पहिल्या टप्प्यात मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians) आणि दिल्ली कॅपिटल्स ( Delhi Capitals) या दोन संघांची कामगिरी उल्लेखनीय झालेली आहे.

By स्वदेश घाणेकर | Published: October 13, 2020 07:45 AM2020-10-13T07:45:00+5:302020-10-13T17:24:55+5:30

whatsapp join usJoin us
Three teams lead the play-off race after mid-IPL 2020; Other teams will have to work hard! | IPL 2020च्या मध्यंतरानंतर तीन संघ Play Offच्या शर्यतीत आघाडीवर; CSKसह अन्य संघांना घ्यावी लागेल प्रचंड मेहनत!

IPL 2020च्या मध्यंतरानंतर तीन संघ Play Offच्या शर्यतीत आघाडीवर; CSKसह अन्य संघांना घ्यावी लागेल प्रचंड मेहनत!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

- स्वदेश घाणेकर
Indian Premier League ( IPL 2020) चे १३वे पर्व मध्यंतरात आले आहे. सर्व संघांनी त्यांच्या वाट्यातील १४ पैकी निम्मे म्हणजेच प्रत्येकी ७ सामने खेळले आहेत. आयपीएल २०२०च्या पहिल्या टप्प्यात मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians) आणि दिल्ली कॅपिटल्स ( Delhi Capitals) या दोन संघांची कामगिरी उल्लेखनीय झालेली आहे. स्फोटक सुरुवात करून देणारे सलामीवीर, गडगडणारा डाव सावरणारी भक्कम मधली फळी, अखेरच्या षटकांत धावांचा पाऊस पाडणारे धडाकेबाज फलंदाज, प्रतिस्पर्धींच्या धावांवर वेसण घालणारे गोलंदाज अन् चपळ क्षेत्ररक्षक या सर्व आघाड्यांवर MI व DC हे दोन्ही संघ इतरांपेक्षा उजवे ठरत आहेत. पण, यंदा सप्राईज पॅकेज ठरत आहेत तो विराट कोहलीचा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( Royal Challengers Bangalore)...

मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स व रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या तिघांनी ७ पैकी ५ सामने जिंकून प्रत्येकी १० गुणांसह Point Tableमध्ये अनुक्रमे पहिले, दुसरे व तिसरे स्थान पक्के केले आहे. त्यामुळे त्यांना आता उर्वरीत ७ पैकी ३ विजयही Play Off मध्ये स्थान पक्के करण्यासाठी पुरेसे आहेत. पण, उरलेल्या एका जागेसाठी चांगली चुरस रंगण्याची शक्यता आहे. त्यात Mid Season Transfer मुळे पहिल्या टप्प्यातील उणीवा दूर करण्यासाठी सर्व संघ आपापल्या ताफ्यात आवश्यक तो बदल करण्यासाठी खेळाडूंची अदलाबदलही करणार आहे. त्यामुळे नव्या खेळाडूंसह सर्व संघ प्ले ऑफमध्ये स्थान निश्चित करण्यासाठी जीवाचं रान करेल हे मात्र नक्की.

मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians)  
रोहित शर्मा ( Rohit Sharma), क्विंटन डी'कॉक ( Quiton de kock), इशान किशान, किरॉन पोलार्ड आणि हार्दिक पांड्या यांनी मुंबईच्या फलंदाजीची धुरा सक्षमपणे सांभाळली आहे. गोलंदाजीत जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट व जेम्स पॅटिन्सन ही वेगानं मारा करणारी फौज मुंबईकडे असल्यानं प्रतिस्पर्धी त्यांना जरा दचकूनच आहेत. कृणाल पांड्या व राहुल चहरला आतापर्यंत फार मोठी कामगिरी करता आली नसली तरी ते विजयात खारीचा वाटा नक्की उचलताना दिसत आहेत. कृणाल फलंदाजीतही योगदान देत आहे. सौरभ तिवारी संघाबाहेर अजून किती काळ राहिल, याचे उत्तर चाहते शोधत आहेत.

मुंबईचे सामने
11 ऑक्टोबर, रविवार - मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, अबु धाबी
16 ऑक्टोबर, शुक्रवार - मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, अबु धाबी
18 ऑक्टोबर, रविवार - मुंबई इंडियन्स विरुद्ध किंग्स इलेव्हन पंजाब, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, दुबई
23 ऑक्टोबर, शुक्रवार - चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, शारजाह
25 ऑक्टोबर, रविवार - राजस्थान ऱॉयल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, अबु धाबी
28 ऑक्टोबर, बुधवार - मुंबई इंडियन्स विरुद्ध ऱॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, अबु धाबी
31 ऑक्टोबर, शनिवार - दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, दुपारी 3.30 वाजल्यापासून, दुबई
3 नोव्हेंबर, मंगळवार - सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, शाहजाह

दिल्ली कॅपिटल्स ( Delhi Capitals) 
पृथ्वी शॉ व शिखर धवन यांच्यासारखे स्फोटक सलामीवीर, कर्णधार श्रेयस अय्यर आणि रिषभ पंत सारखे युवा फलंदाज मधलीफळी सक्षमपणे सांभाळताना दिसत आहेत. पंतला दुखापतीमुळे पुढील दोन सामने खेळता येणार नसले तरी दिल्लीकडे अजिंक्य रहाणेसारखा अनुभवी फलंदाज आहेच. मार्कस स्टॉयनिस हा सप्राईझिंग पॅकेज ठरत आहे. गोलंदाजी व फलंदाजी या दोन्ही आघाड्यांवर तो संघासाठी योगदान देत आहेत. कागिसो रबाडासारखे शस्त्र ज्यांच्याकडे असेल मग त्यांना कशाला भीती.. आर अश्विनच्या रुपानं अनुभवाची मोठी शिदोरीच दिल्लीच्या हाती लागली आहे. अमित मिश्राची उणीव त्यांना नक्की जाणवेल. इशांत शर्मा कधी कमबॅक करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शिमरोन हेटमारय हा प्रतिस्पर्धींची धुलाई करणारा फलंदाजही आहेच त्यांच्याकडे.

दिल्लीचे सामने
14 ऑक्टोबर, बुधवार - दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, दुबई
17 ऑक्टोबर, शनिवार - दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, शारजाह
20 ऑक्टोबर, मंगळवार - किंग्स इलेव्हन पंजाब विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, दुबई
24 ऑक्टोबर, शनिवार - कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, दुपारी 3.30 वाजल्यापासून, अबु धाबी
27 ऑक्टोबर, मंगळवार - सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, दुबई
31 ऑक्टोबर, शनिवार - दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, दुपारी 3.30 वाजल्यापासून, दुबई
2 नोव्हेंबर, सोमवार - दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, अबु धाबी

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( Royal Challengers Bangalore) 
विराट कोहलीच्या या संघाची सर्वात कमकुवत बाजू म्हणजे गोलंदाजी यंदाच्या आयपीएलमध्ये सर्वात मजबूत बाजू म्हणून समोर आली. वॉशिंग्टन सुंदर आणि युझवेंद्र चहल या फिरकीपटूंच्या जोडीनं प्रतिस्पर्धींना तालावर नाचवले. विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स यांची फटकेबाजी सुरूच आहे. पण, यंदाच्या मोसमात त्यांना दमदार सुरुवात करून देणारा देवदत्त पडीक्कल हा सलामीवीर सापडला आहे. त्यामुळेच RCBनं ७ सामन्यांत ५ विजयासह १० गुणांची कमाई करत -०.११६ नेट रन रेटनं तिसरे स्थान पटकावलं आहे.  

बंगळुरूचे सामने
15 ऑक्टोबर, गुरुवार - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध किंग्स इलेव्हन पंजाब, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, शारजाह
17 ऑक्टोबर, शनिवार - राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, दुपारी 3.30 वाजल्यापासून, दुबई
21 ऑक्टोबर, बुधवार - कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, अबु धाबी
25 ऑक्टोबर, रविवार - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स, दुपारी 3.30 वाजल्यापासून, दुबई
28 ऑक्टोबर, बुधवार - मुंबई इंडियन्स विरुद्ध ऱॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, अबु धाबी
31 ऑक्टोबर, शनिवार - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्घ सनरायझर्स हैदराबाद, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, शारजाह
2 नोव्हेंबर, सोमवार - दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, अबु धाबी

कोलकाता नाईट रायडर्स ( Kolkata Knight Riders)
दिनेश कार्तिकच्या नेतृत्वाचा अंदाज बांधणे खरंच अवघड आहे. केव्हा त्याच्या नेतृत्वाचे कौतुक करावेसे वाटतं, तर कधी टीका करावीशी वाटते. चेन्नई आणि पंजाब यांच्याविरुद्ध त्यानं ज्या प्रकारे गोलंदाजांचा वापर केला, ते पाहून सर्वच थक्क झाले. KKRनं गमावलेले सामने जिंकून प्ले ऑफच्या शर्यतीत आगेकूच केली. ७ पैकी त्यांनी ४ सामने जिंकून ८ गुण कमावले आहेत आणि त्यांना उर्वरीत सामन्यांत ४ सामने जिंकावे लागतील. फलंदाजांचा क्रम, ही अजूनही कोलकातासाठी डोकेदुखी आहे. 

कोलकाताचे सामने
16 ऑक्टोबर, शुक्रवार - मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, अबु धाबी
18 ऑक्टोबर, रविवार - सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स, दुपारी 3.30 वाजल्यापासून, अबु धाबी
21 ऑक्टोबर, बुधवार - कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, अबु धाबी
24 ऑक्टोबर, शनिवार - कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, दुपारी 3.30 वाजल्यापासून, अबु धाबी
26 ऑक्टोबर, सोमवार - कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध किंग्स इलेव्हन पंजाब, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, शारजाह
29 ऑक्टोबर, गुरुवार - चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, दुबई
1 नोव्हेंबर, रविवार - कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, दुबई

सनरायझर्स हैदराबाद ( Sunrisers Hyderabad) 
डेव्हिड वॉर्नरच्या मार्गदर्शनाखाली खेळणाऱ्या संघाची घडी अजून चांगली बसलेली नाही. त्यांना सातपैकी केवळ तीन सामने जिंकता आलेले आहेत आणि प्ले ऑफसाठी त्यांना शिल्लक ७पैकी किमान ४-५ सामने जिंकावे लागणार आहेत. वॉर्नर - बेअरस्टो यांना एकाच वेळी सूर गवसत नसल्यानं हैदराबादची कोंडी होत आहे. मधल्या फळीत मनीष पांडे आहे, पण त्याचं असं आहे की 'टीके तो पचास, नही तो पाच'; केन विलियम्सनला खालच्या क्रमांकावर पाठवणे हैदराबादला महागात पडत आहे. केनचा पुरेपूर फायदा करून घेतला जात नाही. मिचेल स्टार्क, भुवनेश्वर कुमार यांच्या माघारीनं हैदराबादला मोठा धक्काच बसला आहे. गोलंदाजीत राशीद खानवर किती भार टाकायचा यालाही मर्यादा आहेत. टी नटराजन हा सप्राईज पॅकेज ठरत आहे. 

हैदराबादचे सामने
13 ऑक्टोबर, मंगळवार - सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, दुबई
18 ऑक्टोबर, रविवार - सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स, दुपारी 3.30 वाजल्यापासून, अबु धाबी
22 ऑक्टोबर, गुरुवार - राजस्थान रॉयल्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, दुबई
24 ऑक्टोबर, शनिवार - किंग्स इलेव्हन पंजाब विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, दुबई
27 ऑक्टोबर, मंगळवार - सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, दुबई
31 ऑक्टोबर, शनिवार - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्घ सनरायझर्स हैदराबाद, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, शारजाह
3 नोव्हेंबर, मंगळवार - सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, शाहजाह

राजस्थान रॉयल्स ( Rajasthan Royals)
बेन स्टोक्सच्या उशीरानं येण्यानं आणि संजू सॅमसनचा फॉर्म हरवल्यानं राजस्थानला मोठा धक्का बसला आहे. स्टीव्ह स्मिथ व जोस बटलर त्यांच्या कुवतीप्रमाणे सामना खेचत आहेत. रियान पराग व राहुल टेवाटिया हे दबावात फटकेबाजी करून सामना खेचून आणत आहेत, परंतु त्यांच्या भरवशावर आघाडीची फळी नांग्या टाकताना दिसत आहे. गोलंदाजीत जोफ्रा आर्चर वगळता त्यांच्या संघातून अन्य कुणी छाप पाडणारी कामगिरी केलेली नाही. ७ पैकी ३ सामने जिंकून ६ गुणांसह ते सहाव्या स्थानावर आहेत. त्यांना उरलेल्या ७पैकी ४-५ सामने जिंकावे लागतील.

राजस्थानचे सामने 
14 ऑक्टोबर, बुधवार - दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, दुबई
17 ऑक्टोबर, शनिवार - राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, दुपारी 3.30 वाजल्यापासून, दुबई
19 ऑक्टोबर, सोमवार - चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, अबु धाबी
22 ऑक्टोबर, गुरुवार - राजस्थान रॉयल्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, दुबई
25 ऑक्टोबर, रविवार - राजस्थान ऱॉयल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, अबु धाबी
30 ऑक्टोबर, शुक्रवार - किंग्स इलेव्हन पंजाब विरुद्ध राजस्थान रॉयल्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, अबु धाबी
1 नोव्हेंबर, रविवार - कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, दुबई

चेन्नई सुपर किंग्स ( Chennai Super Kings) 
CSK चा संघ यंदा प्ले ऑफपर्यंत मजल मारेल का? यावर सट्टा लावला जात आहे आणि बरीच जण 'नाही' याच पक्षातील आहेत. डॅडी आर्मी असलेल्या चेन्नईनं यंदाच्या लीगमध्ये सपशेल निराश केले. सुरेश रैना व हरभजन सिंग यांच्या माघारीनंतर बसलेल्या धक्क्यातून संघ डोकं वरच काढताना दिसत नाही. त्यात प्रत्येक सामन्यानंतर कर्णधार महेंद्रसिंग धोनी ( MS Dhoni) प्रयोग सुरू आहेत, फलंदाज अपयशी ठरत आहेत, हेच सांगतोय. ७ पैकी २ विजय मिळवून ४ गुणांसह सातव्या स्थानावर असलेला हा संघ प्ले ऑफमध्ये प्रवेश मिळवेल, याची शक्यता अंधुक आहे. पण, २०१०मध्ये अशाच परिस्थितीतून चेन्नईनं थेट अंतिम फेरीत प्रवेश करून जेतेपद पटकावले होते. पण, तेव्हाचा संघ अन् आताच्या वाढलेल्या वयाचे खेळाडू यात फरक आहे. त्यांना ७ पैकी ६ सामने जिंकावेच लागतील.

चेन्नईचे सामने
13 ऑक्टोबर, मंगळवार - सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, दुबई
17 ऑक्टोबर, शनिवार - दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, शारजाह
19 ऑक्टोबर, सोमवार - चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, अबु धाबी
23 ऑक्टोबर, शुक्रवार - चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, शारजाह
25 ऑक्टोबर, रविवार - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स, दुपारी 3.30 वाजल्यापासून, दुबई
29 ऑक्टोबर, गुरुवार - चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, दुबई
1 नोव्हेंबर, रविवार - चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध किंग्स इलेव्हन पंजाब, दुपारी 3.30 वाजल्यापासून, अबु धाबी

किंग्स इलेव्हन पंजाब ( Kings XI Punjab)
लोकेश राहुलच्या नेतृत्वाखाली हा संघ क्रांती घडवेल असे वाटले होते. तशी सुरुवातच त्यांच्याकडून झाली होती, पण पंजाबची गाडी रुळावरून घसरली ती थेट यार्डात जाण्यासाठीच. लोकेश, मयांक अग्रवाल वगळता अन्य फलंदाजांनी निराश केले. १० कोटी मोजून ताफ्यात घेतलेला ग्लेन मॅक्सवेल काय कामाचा? हाच प्रश्न सर्वांना पडला आहे. मोहम्मद शमी त्याची बाजू सेफ करून आहे, परंतु त्याला इतरांकडून साथच मिळत नाही. ७ पैकी १ विजयासह हा संघ तळाला आहे आणि त्यांना ७ पैकी ७ सामने जिंकावे लागणार आहेत.

पंजाबचे सामने
15 ऑक्टोबर, गुरुवार - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध किंग्स इलेव्हन पंजाब, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, शारजाह
18 ऑक्टोबर, रविवार - मुंबई इंडियन्स विरुद्ध किंग्स इलेव्हन पंजाब, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, दुबई
20 ऑक्टोबर, मंगळवार - किंग्स इलेव्हन पंजाब विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, दुबई
24 ऑक्टोबर, शनिवार - किंग्स इलेव्हन पंजाब विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, दुबई
26 ऑक्टोबर, सोमवार - कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध किंग्स इलेव्हन पंजाब, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, शारजाह
30 ऑक्टोबर, शुक्रवार - किंग्स इलेव्हन पंजाब विरुद्ध राजस्थान रॉयल्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, अबु धाबी
1 नोव्हेंबर, रविवार - चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध किंग्स इलेव्हन पंजाब, दुपारी 3.30 वाजल्यापासून, अबु धाबी

Web Title: Three teams lead the play-off race after mid-IPL 2020; Other teams will have to work hard!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.