आली लहर, युवीने केला कहर, एकाच षटकात सलग चार षटकार

शनिवारी रात्री झालेल्या या सामन्यात केवळ युवीच नाही, तर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनेही आपल्या जुन्या स्टाईलने तडाखेबंद फलंदाजी करत चाहत्यांना चौकार-षटकारांची मेजवानीच दिली.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2021 02:32 AM2021-03-15T02:32:39+5:302021-03-15T06:49:43+5:30

whatsapp join usJoin us
There was a wave, Yuvraj singh made havoc, four sixes in a row in one over | आली लहर, युवीने केला कहर, एकाच षटकात सलग चार षटकार

आली लहर, युवीने केला कहर, एकाच षटकात सलग चार षटकार

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

रायपूर : २००७ साली झालेल्या पहिल्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत इंग्लंडविरुद्ध एकाच षटकात सलग सहा षटकार ठोकलेल्या युवराज सिंगने पुन्हा एकदा आपला दणका दाखवला. यावेळी त्याने दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना आपला दणका देताना एकाच षटकात सलग चार षटकार ठोकले. युवीचा हा जलवा सोशल मीडियावरही चर्चेचा विषय ठरला. (There was a wave, Yuvraj singh made havoc, four sixes in a row in one over)

शनिवारी रात्री झालेल्या या सामन्यात केवळ युवीच नाही, तर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनेही आपल्या जुन्या स्टाईलने तडाखेबंद फलंदाजी करत चाहत्यांना चौकार-षटकारांची मेजवानीच दिली. सचिन-युवीच्या तडाख्याच्या जोरावर इंडिया लिजेंड्स संघाने २० षटकात ३ बाद २०४ धावांचा डोंगर उभारला. यानंतर दक्षिण आफ्रिका लिजेंड्स संघाला ७ बाद १४८ धावांवर रोखत भारतीयांनी ५६ धावांनी बाजी मारली.

संपूर्ण सामन्यात लक्षवेधी ठरला तो युवराज सिंग. आधी फलंदाजीत वर्चस्व गाजवल्यानंतर गोलंदाजीतही त्याने २ बळी घेत भारताच्या विजयात निर्णायक अष्टपैलू खेळ केला. युवराजने केवळ २२ चेंडूंत नाबाद ५२ धावांचा तडाखा दिला. त्याआधी सचिनने आपला दांडपट्टा चालवताना ३७ चेंडूंत ६० धावा कुटल्या. या दरम्यान सचिनने ९ चौकार आणि एक षटकार ठोकला. आपल्या खेळीदरम्यान सचिनने रिव्हर्स स्वीपचा सहजतेने वापर करत लक्ष वेधले. दुसरीकडे, धडाकेबाज युवीने आफ्रिकेच्या गोलंदाजांवर तुफानी हल्ला चढवताना २ चौकार आणि ६ षटकारांचा पाऊस पाडला.

आफ्रिकेचे फलंदाज अपयशी
मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचे फलंदाज अपयशी ठरले. आवश्यक धावगतीच्या दडपणाखाली त्यांच्याकडून चुका झाल्या. अँड्र्यू प्युटिक (४१), मॉर्नी वॅन वीक (४८) यांनी अपयशी झुंज दिली. युसुफ पठाणने ३, तर युवीने २ बळी घेत भारताच्या विजयात मोलाचे योगदान दिले.

युवराजचा कहर
१८व्या षटकामध्ये युवीने २००७ सालच्या टी-२० विश्वचषक स्पर्धेची आठवण करून देताना जेंडर डी ब्रुइनच्या गोलंदाजीवर सलग चार षटकार ठोकले. पहिला चेंडू निर्धाव गेल्यानंतर दुसरा, तिसरा, चौथा आणि पाचवा चेंडू युवीने मैदानाबाहेर भिरकावला. 
 

Web Title: There was a wave, Yuvraj singh made havoc, four sixes in a row in one over

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.