There is no one like Dhoni, rohit sharma | धोनीसारखा कुणीच नाही, कुणाशीही तुलना करणे योग्य नाही

धोनीसारखा कुणीच नाही, कुणाशीही तुलना करणे योग्य नाही

नवी दिल्ली : ‘महेंद्रसिंग धोनीसारखा दुसरा कुणी खेळाडू नसून त्याच्यासारखा तोच एकमेव आहे. धोनीसारख्या खेळाडूसोबत तुलना होणे योग्य नाही,’ असे मत भारताचा स्टार सलामीवीर रोहित शर्मा याने व्यक्त केले.

काही दिवसापूर्वी भारताचा अनुभवी क्रिकेटपटू सुरेश रैना याने एका कार्यक्रमामध्ये रोहितची, तुलना भारतीय क्रिकेटचा पुढील महेंद्रसिंग धोनी अशी केली होती. आयपीएलमध्येही सर्वात यशस्वी कर्णधारांमध्ये रोहित शर्मा आणि महेंद्रसिंग धोनी यांचेच नाव आघाडीवर आहे. एका चाहत्याने याबाबतीत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना रोहितने टिष्ट्वटरवर सांगितले की, ‘होय, मी सुरेश रैनाची टिप्पणी ऐकली आहे. महेंद्रसिंग धोनीसारखा दुसरा कुणी खेळाडू नसून त्याच्यासारखा तोच एकमेव आहे. माझ्यामते अशा प्रकारची तुलना करणे योग्य नाही. प्रत्येकाची बलस्थाने आणि कच्चे दुवे असतात.’ आयपीएल आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून रोहितने पाडलेली छाप पाहून रैना प्रभावित आहे. रैनाने म्हटले की, ‘मी रोहितला पाहिले आहे, तो दुसऱ्यांचे मत जाणून घेतो.’

गतविजेता मुंबई इंडियन्स सज्ज
गतविजेत्या मुंबई इंडियन्सचे खेळाडू एका ठिकाणी येऊ लागले आहेत. अनेक खेळाडू मुंबईला पोहचले असून काही खेळाडू पुढील आठवड्यापर्यंत येतील. स्टार खेळाडूही पुढील ७-८ दिवसांमध्ये संघासोबत जुळतील. कोणताही खेळाडू कोरोनाग्रस्त होऊ नये यासाठी कठोर नियम तयार करण्यात आले आहेत. जे खेळाडू मुंबईत आले आहेत, त्यांना १४ दिवस क्वारंटाईन करण्यात आले आहे. क्वारंटाईन कालावधी संपल्यानंतर खेळाडू मैदानावर सराव करू शकतील,’असे संघाच्या अधिकाºयाने सांगितले.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: There is no one like Dhoni, rohit sharma

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.