Team India’s jersey : टीम इंडियाच्या नव्या जर्सीवर तीन स्टार का आहेत हे माहित्येय?; जाणून घ्या महत्त्वाचे अपडेट्स

आगामी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघ नव्या जर्सीत दिसणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2021 04:39 PM2021-10-13T16:39:01+5:302021-10-13T16:58:22+5:30

whatsapp join usJoin us
Team India’s jersey : Here’s why India’s T20 World Cup 2021 jersey have three stars | Team India’s jersey : टीम इंडियाच्या नव्या जर्सीवर तीन स्टार का आहेत हे माहित्येय?; जाणून घ्या महत्त्वाचे अपडेट्स

Team India’s jersey : टीम इंडियाच्या नव्या जर्सीवर तीन स्टार का आहेत हे माहित्येय?; जाणून घ्या महत्त्वाचे अपडेट्स

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

आगामी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघ नव्या जर्सीत दिसणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात BCCIनं बुधावारी टीम इंडियाच्या नव्या जर्सीचे अनावरण केलं. त्यामुळे टीम इंडियाची रेट्रो जर्सी पुन्हा रिटायर्ड झाली आहे. १७ ऑक्टोबरपासून यूएई व ओमान येथे ट्वेंटी-२० वर्ल्ड कपची सुरुवात होणार आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणारी टीम इंडिया जेतेपदाची प्रबळ दावेदार आहे.

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली, उपकर्णधार रोहित शर्मा, अष्टपैलू रविंद्र जडेजा, गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि फलंदाज केएल राहुल यांनी नवी जर्सी परिधान केल्याचा फोटो शेअर करण्यात आला आहे. भारताची ही जर्सी नेव्ही ब्लू रंगाचीच आहे आणि जर्सीच्या पुढच्या भागावर लाईट निळ्या रंगांच्या रेषा आहेत. इंडिया व खेळाडूंची नावं भगव्या रंगानं लिहिली गेली आहेत आणि  डाव्या बाजूला बीसीसीआयचा लोगो आहे. पण, त्या लोगोवर तीन स्टार का आहेत, यामागचं उत्तर शोधूयात..

 
बीसीसीआयच्या लोगोवर लीन स्टारचे उत्तर म्हणजे टीम इंडियानं आतापर्यंत जिंकलेली तीन वर्ल्ड कपची जेतेपदं... त्याची ही प्रतिकं आहेत. १९८३मध्ये कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारतानं प्रथम वन डे वर्ल्ड कप जिंकला. २४ वर्षांनंतर भारतानं महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली २००७मध्ये ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जिंकला. त्यानंतर पुन्हा धोनीच्याच नेतृत्वाखाली भारतानं २०११मध्ये वन डे वर्ल्ड कप जिंकला. या विश्वविजेतेपदाचं प्रतिक म्हणून हे तीन स्टार जर्सीवर आहेत.

   
भारतीय संघ - विराट कोहली, रोहित शर्मा, लोकेश राहुल, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, इशान किशन, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, राहुल चहर, आर अश्विन, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्थी, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी; राखीव खेळाडू - श्रेयस अय्यर, शार्दूल ठाकूर व दीपक चहर 

Web Title: Team India’s jersey : Here’s why India’s T20 World Cup 2021 jersey have three stars

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.