टीम इंडियाचा व्यस्त कार्यक्रम; भारत विश्व टी-२० स्पर्धेचे यजमानपद भूषविणार

क्रिकेट चाहत्यांना पर्वणी : भारत विश्व टी-२० स्पर्धेचे यजमानपद भूषविणार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2021 12:18 AM2021-01-01T00:18:55+5:302021-01-01T07:02:15+5:30

whatsapp join usJoin us
Team India's busy schedule; India to host World Twenty20 | टीम इंडियाचा व्यस्त कार्यक्रम; भारत विश्व टी-२० स्पर्धेचे यजमानपद भूषविणार

टीम इंडियाचा व्यस्त कार्यक्रम; भारत विश्व टी-२० स्पर्धेचे यजमानपद भूषविणार

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट चाहत्यांना २०२१ मध्ये टी-२० विश्वचषक स्पर्धेचा आनंद उपभोगता येणार आहे. त्याचे यजमानपद भारत भूषवीत आहे. नव्या वर्षात भारतीय क्रिकेट संघाचे वेळापत्रक व्यस्त आहे. २०२१ मध्ये टीम इंडिया १४ कसोटी, १६ वन-डे व २३ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळणार आहे. या व्यतिरिक्त आयपीएल, आशिया कप यांचाही संघाच्या व्यस्त कार्यक्रमामध्ये समावेश आहे. भारतीय संघ २०२१ मध्ये जवजवळ १० मालिकांमध्ये व्यस्त राहील.

जानेवारी : ऑस्ट्रेलिया दौरा

जानेवारी २०२१ मध्ये भारतीय संघ ऑस्ट्रेलियात असेल. बॉर्डर-गावसकर ट्रॉफीचा तिसरा कसोटी सामना ७ जानेवारीपासून सिडनीमध्ये खेळला जाणार आहे. चौथा कसोटी सामना १५ ते १९ जानेवारी या कालावधीत ब्रिस्बेनमध्ये खेळला जाईल.

फेब्रुवारी-मार्च (इंग्लंडचा भारत दौरा)

भारत इंग्लंडविरुद्ध चार कसोटी, तीन वन-डे आणि पाच टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांचे यजमानपद भूषविणार आहे. तिसरा कसोटी सामना अहमदाबादच्या नवनिर्मित मोटेरा स्टेडियममध्ये खेळला जाणार असून, हा सामना दिवस-रात्र खेळला जाईल. टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या मालिकेची सुरुवात १२ मार्चला होईल. सर्व सामने २० मार्चपर्यंत अहमदाबादमध्ये खेळले जातील. या व्यतिरिक्त तीन सामन्यांची वन-डे मालिका पुणे येथे खेळल्या जाईल.

एप्रिल-मे (आयपीएल)

आयपीएल-२०२१ चे आयोजन यावेळी भारतात होणार आहे. २०२० च्या आयपीएल स्पर्धेचे आयोजन यूएईमध्ये झाले होते. त्यात मुंबई इंडियन्स संघाने जेतेपद पटकाविले होते.

जून-जुलै (श्रीलंका दौरा  व आशिया कप)

भारतीय संघ जून व जुलैमध्ये श्रीलंकेत तीन वन-डे व पाच टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांची मालिका खेळेल. वन-डे व टी-२० मालिकेनंतर भारत श्रीलंकेच्या यजमानपदाखाली आयोजित आशिया कप स्पर्धेत सहभागी होईल. या स्पर्धेच्या कार्यक्रमाची घोषणा अद्याप झालेली नाही.

जुलै (झिम्बाब्वे दौरा)

झिम्बाब्वे दौऱ्यात भारतीय संघ टी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहे. त्यात सीनिअर भारतीय खेळाडूंना विश्रांती देण्यात येण्याची शक्यता आहे.

ऑगस्ट-सप्टेंबर (भारताचा इंग्लंड दौरा)

इंग्लंड दौऱ्यात भारतीय संघ पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळेल. पहिला कसोटी सामना ४ ऑगस्टपासून खेळला जाईल. दुसरी कसोटी १२ ऑगस्टपासून, तिसरी कसोटी २५ ऑगस्टपासून, चौथी कसोटी २ सप्टेंबरपासून, तर पाचवी व अखेरची कसोटी १० सप्टेंबरपासून खेळली जाईल.

टी-२० विश्व कप (ऑक्टोबर-नोव्हेंबर)

या स्पर्धेचे यजमानपद भारत भूषविणार आहे; पण या महाआयोजनापूर्वी भारताला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन वन-डे व पाच टी-२० सामन्यांची मालिका खेळायची आहे.

डिसेंबर (भारताचा द. आफ्रिका दौरा)

डिसेंबर २०२१ मध्ये भारत न्यूझीलंडविरुद्ध दोन कसोटी व तीन टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांचे यजमानपद भूषवेल. त्यानंतर वर्षाच्या शेवटी भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाईल. तेथे टीम इंडिया तीन कसोटी व तीन 
टी-२० सामन्यांची मालिका खेळेल.

Web Title: Team India's busy schedule; India to host World Twenty20

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.