आता दक्षिण आफ्रिकेला नव्हे तर टीम इंडियाला म्हणावं लागेल 'Chokers'; आकडेच देत आहेत तसे संकेत!

भारतीय संघाला जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमध्ये ( ICC World Test Championship Final) न्यूझीलंडकडून ८ विकेट्सनं पराभव पत्करावा लागला.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2021 05:00 PM2021-06-24T17:00:28+5:302021-06-24T17:09:09+5:30

whatsapp join usJoin us
Team India became the new chokers after not winning a single ICC trophy since 2013 | आता दक्षिण आफ्रिकेला नव्हे तर टीम इंडियाला म्हणावं लागेल 'Chokers'; आकडेच देत आहेत तसे संकेत!

आता दक्षिण आफ्रिकेला नव्हे तर टीम इंडियाला म्हणावं लागेल 'Chokers'; आकडेच देत आहेत तसे संकेत!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्देभारतीय संघानं महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली २०१३ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. त्यानंतर सहा आयसीसी स्पर्धांमध्ये टीम इंडियाला बाद फेरीत पराभव पत्करावा लागला आहे.

भारतीय संघाला जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमध्ये ( ICC World Test Championship Final) न्यूझीलंडकडून ८ विकेट्सनं पराभव पत्करावा लागला. भारताला दुसऱ्या डावात १७० धावाच करता आल्या अन् न्यूझीलंडनं केन विलियम्सन व रॉस टेलर या अनुभवी जोडीच्या जोरावर सहज विजय मिळवला. भारताला पराभव पत्करावा लागल्यानं विराट कोहलीचं आयसीसी ट्रॉफी जिंकण्याचं स्वप्न पुन्हा धुळीस मिळालं अन् सोशल मीडियावर टीम इंडियासाठी 'Chokers' हा ट्रेंड सुरू झाला. आतापर्यंत आयसीसी स्पर्धांमध्ये मोक्याच्या क्षणी कच खाणाऱ्या दक्षिण आफ्रिकेला हा टॅग दिला गेला होता, परंतु आता तो टीम इंडियाच्या माथी लागलेला पाहायला मिळत आहे.

मोठं यश सहज मिळत नाही!, WTC Final मधील पराभवानंतर रवी शास्त्रींनी केलं ट्विट...

WTC Finalच्या पराभवाला कर्णधार विराट कोहलीला जबाबदार ठरवले जात आहे. विराटच्या नशीबात आयसीसीची ट्रॉफी नाहीच, असा लोकांना आता समज करून घेतला आहे. त्यामुळेच टीम इंडिया नवे चोकर्स होत आहेत का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. २०१७च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये टीम इंडियाला पाकिस्तानकडून पराभव पत्करावा लागला. २०१९ च्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत न्यूझीलंडनं उपांत्य फेरीत भारताचा पराभव केला अन् कसोटी वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये पुन्हा किवींनी विराट अँड कंपनीला लोळवले. 




२०१३ नंतर भारतानं आयसीसीची स्पर्धा जिंकलेली नाही
भारतीय संघानं महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली २०१३ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. त्यानंतर सहा आयसीसी स्पर्धांमध्ये टीम इंडियाला बाद फेरीत पराभव पत्करावा लागला आहे.   

Web Title: Team India became the new chokers after not winning a single ICC trophy since 2013

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.