T20 World Cup, PAK vs WI : पाकिस्ताननं दम दाखवला; गतविजेत्या वेस्ट इंडिजला पराभूत करून टीम इंडियाला चॅलेंज दिलं

T20 World Cup : Pakistan beat West Indies by 7 wickets : पाकिस्तान संघानं पहिल्याच सराव सामन्यात गतविजेत्या वेस्ट इंडिजवर ७ विकेट्स राखून विजय मिळवला.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2021 07:43 PM2021-10-18T19:43:39+5:302021-10-18T19:43:56+5:30

whatsapp join usJoin us
T20 World Cup : Pakistan beat West Indies by 7 wickets in the Warm-up match - fifty from Babar and 46*(24) from Fakhar, Video | T20 World Cup, PAK vs WI : पाकिस्ताननं दम दाखवला; गतविजेत्या वेस्ट इंडिजला पराभूत करून टीम इंडियाला चॅलेंज दिलं

T20 World Cup, PAK vs WI : पाकिस्ताननं दम दाखवला; गतविजेत्या वेस्ट इंडिजला पराभूत करून टीम इंडियाला चॅलेंज दिलं

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

T20 World Cup : Pakistan beat West Indies by 7 wickets : पाकिस्तान संघानं पहिल्याच सराव सामन्यात गतविजेत्या वेस्ट इंडिजवर ७ विकेट्स राखून विजय मिळवला. पाकिस्तानच्या खेळाडूंनी सर्व आघाड्यांवर उल्लेखनीय कामगिरी करताना टीम इंडियाचं टेंशन वाढवलं आहे. भारत-पाकिस्तान यांच्यात २४ ऑक्टोबरला सामना होणार आहे. वेस्ट इंडिजनं ठेवलेलं १३१ धावांचे लक्ष्य पाकिस्ताननं १५.३ षटकांत पूर्ण केलं. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने (Babar Azam) ४१ चेंडूंत ५० धाला तर फाखर झमानने २४ चेंडूंत ४६ धावा कुटल्या. 

विंडीजचा कर्णधार किरॉन पोलार्ड (Kieron Pollard) यानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. यानंतर पाकिस्तानच्या गोलंदाजांनी सुरुवातीपासूनच वेस्ट इंडिजला धक्के दिले. विंडीजला २० षटकांत ७ बाद १३० धावा करता आल्या. किरॉन पोलार्डनं अखेरच्या षटकात सलग पाच चौकार खेचून विंडीजची धावसंख्या वाढवली. शिमरोन हेटमायरने २८ धावा केल्या, तर पोलार्डनं १० चेंडूंत २३ धावा कुटल्या. 

Web Title: T20 World Cup : Pakistan beat West Indies by 7 wickets in the Warm-up match - fifty from Babar and 46*(24) from Fakhar, Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.