T20 World Cup, IREvNED, Curtis Campher : आयर्लंडच्या कर्टीस कॅम्फेरनं इतिहास घडवला, वर्ल्ड कप स्पर्धेत असा विक्रम कुणालाच नाही जमला!

T20 World Cup, IRELAND V NETHERLANDS -T20 World Cup स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी क्रिकेट प्रेमींना अस्सल मेजवानी मिळाली.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2021 04:50 PM2021-10-18T16:50:37+5:302021-10-18T16:51:28+5:30

whatsapp join usJoin us
T20 World Cup, IREvNED : Curtis Campher picked up 4 wickets in 4 balls, become first bowler to achieve this feat in T20 World cup | T20 World Cup, IREvNED, Curtis Campher : आयर्लंडच्या कर्टीस कॅम्फेरनं इतिहास घडवला, वर्ल्ड कप स्पर्धेत असा विक्रम कुणालाच नाही जमला!

T20 World Cup, IREvNED, Curtis Campher : आयर्लंडच्या कर्टीस कॅम्फेरनं इतिहास घडवला, वर्ल्ड कप स्पर्धेत असा विक्रम कुणालाच नाही जमला!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

 T20 World Cup, IRELAND V NETHERLANDS -T20 World Cup स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी क्रिकेट प्रेमींना अस्सल मेजवानी मिळाली. ओमाननं आतापर्यंत केवळ ऑस्ट्रेलिया व दक्षिण आफ्रिका या बलाढ्य संघांना जमलेला पराक्रम करताना ट्वेंटी-२० वर्ल्ड कपमध्ये पापुआ न्यू गिनी संघावर १० विकेट्स राखून विजय मिळवला. त्यात दुसऱ्या सामन्यात स्कॉटलंडनं जबरदस्त खेळ करताना बांगलादेशवर ६ धावांनी थराराक विजय मिळवत, आश्चर्यकारक निकाल नोंदवला. दुसऱ्या दिवशीही हाच थरार कायम राहिलेला पाहायला मिळत आहे. आयर्लंड विरुद्ध नेदरलँड्स ( IRELAND V NETHERLANDS) या लढतीत आयरीश गोलंदाज कर्टीस कॅम्फेर ( Curtis Campher ) यानं इतिहास घडवला.

नाणेफेक जिंकून नेदरलँड्सनं प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. परंतु त्यांचा ६ फलंदाज अवघ्या ५१ धावांवर माघारी परतले. विशेष म्हणजे चार फलंदाज एकही धावाची भर न घालता तंबूत गेले. बेन कूपर ( ०) पहिल्याच षटकात धावबाद झाला. बॅस डे लीड ( ७)  यानं खेळपट्टीवर टीकण्याचा प्रयत्न केला, परंतु जोशुआ लिटल यानं त्याला बाद केले. त्यानंतर तिसऱ्या विकेटसाठी आयर्लंडला १०व्या षटकापर्यंत प्रतीक्षा करावी लागली. पण, या प्रतिक्षेचं फळ मिळालं अन् तेही एक-दोन नव्हे तर चार फलंदाजांच्या रुपानं. कर्टीस कॅम्फेरनं १०व्य़ा षटकाच्या दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या व पाचव्या अशा सलग चार चेंडूंवर चार विकेट्स घेत इतिहास घडवला.  ( Curtis Campher becomes the first Ireland bowler to take a hattrick in T20 World Cup.) 

  • ९.२ चेंडू - कॉलिन अॅकर्मन झे. नेल रॉक गो. कर्टीस कॅम्फेर ११ ( १६)
  • ९.३ चेंडू - रियान टेन डोएश्चॅट पायचीत गो. कर्टीस कॅम्फेर ० ( १)
  • ९.४ चेंडू - स्टॉट एडवर्ड्स पायचीत गो. कर्टीस कॅम्फेर ० (१)
  • ९.५ चेंडूं- रोएलॉफ व्हॅन डेर मर्वे त्रि. गो. कर्टीस कॅम्फेर ० ( १)  

२००७नंतर ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत हॅटट्रिक घेणारा कर्टीस हा पहिलाच फलंदाज ठरला. २००७मध्ये ऑस्ट्रेलियाच्या ब्रेट लीनं बांगलादेशविरुद्ध हा विक्रम नोंदवला होता.  पण, कर्टीस हा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत ४ चेंडूंत ४ विकेट्स घेणारा जगातला पहिलाच गोलंदाज ठरला. ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये लसिथ मलिंगा व राशिद खान यांनी हा पराक्रम केला आहे, परंतु त्यांना वर्ल्ड कप स्पर्धेत अशी कामगिरी करता आली नाही. मलिंगा ( वि. न्यूझीलंड) आणि राशिद ( वि. आयर्लंड) यांनी २०१९मध्ये हा पराक्रम केला होता.  

Web Title: T20 World Cup, IREvNED : Curtis Campher picked up 4 wickets in 4 balls, become first bowler to achieve this feat in T20 World cup

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.