India vs Pakistan : भारताचा सामना करण्यापूर्वी PCBनं बैठक बोलावली; 'तो' व्हिडीओ दाखवून पाकिस्तानी खेळाडूंचे वाढवले मनोबल

T20 World Cup, India vs Pakistan : टीम इंडियाचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत सामना करण्यापूर्वी पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं ( PCB) खेळाडूंची बैठक बोलावली.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2021 04:46 PM2021-10-22T16:46:20+5:302021-10-23T13:27:37+5:30

whatsapp join usJoin us
T20 World Cup, India vs Pakistan : PCB calls for special meeting with Babar Azam & team, players shown ICC Champions trophy victory over India  | India vs Pakistan : भारताचा सामना करण्यापूर्वी PCBनं बैठक बोलावली; 'तो' व्हिडीओ दाखवून पाकिस्तानी खेळाडूंचे वाढवले मनोबल

India vs Pakistan : भारताचा सामना करण्यापूर्वी PCBनं बैठक बोलावली; 'तो' व्हिडीओ दाखवून पाकिस्तानी खेळाडूंचे वाढवले मनोबल

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

T20 World Cup, India vs Pakistan : विराट कोहलीच्या ( Virat Kohli) नेतृत्वाखाली खेळणाऱ्या टीम इंडियाचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत सामना करण्यापूर्वी पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं ( PCB) खेळाडूंची बैठक बोलावली.  टीम इंडियाला कसे पराभूत करता येईल, यावर या बैठकीत प्रदीर्घ चर्चा झाली, परंतु यावेळी दाखवण्यात आलेल्या एका व्हिडीओवरून PCB चर्चेत आले आहे. या बैठकीत खेळाडूंसाठी २०१७ च्या ICC Champions Trophy Finalचं स्पेशल स्क्रिनिंग दाखवण्यात आलं. पाकिस्तानला वर्ल्ड कप स्पर्धेत टीम इंडियावर एकदाही विजय मिळवता आलेला नाही, परंतु आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीतील विजयी सामन्याचे पुनर्प्रक्षेपण दाखवून PCBनं खेळाडूंचं मनोबल उंचावण्याचं काम केलं.

२०१७च्या चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलमध्ये सर्फराज अहमदच्या नेतृत्वाखाली पाकिस्ताननं १८० धावांनी विजय मिळवला होता. पाकिस्तानच्या ३३८ धावांच्या प्रत्युत्तरात विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या टीम इंडियाचा डाव १५८ धावांवर गडगडला. त्या विजयी संघातील फाखर जमान, बाबर आजम, मोहम्मद हाफिज, हसन अली, शाबाद खान हे यंदाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप संघातील सदस्य आहेत.    

पाकिस्तानचा वर्ल्ड कप संघ - बाबर आझम, आसीफ अली, मोहम्मद हाफिज, शोएब मलिक, मोहम्मद रिझवान, इमाद वासीम, मोहम्मद नवाझ, मोहम्मद वासीम, शाबाद खान, हॅरीस रौफ, हसन अली, शाहिन शाह आफ्रिदी, सर्फराज अहमद, हैदर अली व फाखर झमान 

इंझमाम म्हणाला भारतच वर्ल्डकपचा दावेदार, पाक विरुद्धच्या सामन्याबाबत केलं मोठं विधान
 

पाकिस्तानचा दिग्गज माजी कर्णधार इंझमाम उल हक यानं यंदाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जेतेपदासाठी भारतच प्रबळ दावेदार असल्याचं विधान केलं आहे. "भारतानं ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सराव सामना सहजपणे जिंकला. उपखंडातील अशा खेळपट्ट्यांवर भारत जगातील सर्वात घातक ट्वेन्टी-२० क्रिकेट संघ ठरतो. भारतानं १५५ धावांचं लक्ष्य सहजपणे गाठलं आणि विराट कोहलीलाही फलंदाजीची या सामन्यात गरज भासली नाही. कोणत्याही स्पर्धेत नेमका कोणता संघ जिंकेल असा दावा केला जाऊ शकत नाही. पण असं असलं तरी ट्वेन्टी-२० वर्ल्डकप स्पर्धेसाठी इतर संघांच्या तुलनेत भारतीय संघाच्या विजयाची शक्यता अधिक आहे", असं इंझमाम उल हक यांनी आपल्या यूट्यूब चॅनलवरील कार्यक्रमात म्हटलं आहे. 

Web Title: T20 World Cup, India vs Pakistan : PCB calls for special meeting with Babar Azam & team, players shown ICC Champions trophy victory over India 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.