रिया चक्रवर्तीला अटक; इंग्लंडच्या गोलंदाजानं 7 वर्षांपूर्वी केलेलं ट्विट व्हायरल, जाणून घ्या काय कनेक्शन

Rhea Chakraborty arrested : रिया चक्रवर्तीला ( Rhea Chakraborty )  एनसीबीने ड्रग्स प्रकरणात अटक केली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2020 09:30 PM2020-09-08T21:30:20+5:302020-09-08T21:30:44+5:30

whatsapp join usJoin us
Sushant Singh Rajput girlfriend Rhea Chakraborty arrested, Jofra Archer old tweets goes viral | रिया चक्रवर्तीला अटक; इंग्लंडच्या गोलंदाजानं 7 वर्षांपूर्वी केलेलं ट्विट व्हायरल, जाणून घ्या काय कनेक्शन

रिया चक्रवर्तीला अटक; इंग्लंडच्या गोलंदाजानं 7 वर्षांपूर्वी केलेलं ट्विट व्हायरल, जाणून घ्या काय कनेक्शन

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीला ( Rhea Chakraborty )  एनसीबीने ड्रग्स प्रकरणात अटक केली आहे. या प्रकरणी रियाची सलग तीन दिवस चौकशी करण्यात आली. त्यानंतर अखेर आज तिला अटक करण्यात आली आहे. रियाची ( Rhea Chakraborty )  रविवारी सहा तास आणि सोमवारी आठ तास चौकशी करण्यात आली. रियाचा भाऊ शोविकला आधीच अटक करण्यात आली आहे. रियाला अटक करण्यात आल्यानंतर इंग्लंडचा गोलंदाज जोफ्रा आर्चर ( Jofra Archer) याचं ट्विट व्हायरल होऊ लागलं आहे. ( Jofra Archer old tweets goes viral )

IPL 2020 जिंकणार कोण?, बेटिंग कंपन्यांची पसंती 'या' संघाला; बघा तूमचा फेव्हरिट संघ कितव्या स्थानी

रियाचा भाऊ शोविक आधीपासूनच ड्रग्ज प्रकरणात एनसीबीच्या अटकेत आहे. एनसीबीने एनडीपीएस ऍक्ट अन्वये अटक करण्यात आली आहे. याआधी एनसीबीने रियाचा भाऊ शोविक, सुशांतचा हाऊस मॅनेजर सॅम्युअल मिरांडा आणि कुक दीपेश सावंत यांना अटक केली आहे. ( Jofra Archer old tweets goes viral )

रियाची अटक अन् आर्चरचे ट्विट, काय आहे कनेक्शन? 
इंग्लंडचा जलदगती गोलंदाज आर्चर याचे ट्विट नेहमी चर्चेचे विषय बनलेले असतात. आर्चरला भविष्यवक्ता असेही काही जण संबोधतात. त्याच्या जुन्या ट्विट्सचा वर्तमानातील घटनांशी संबंध जोडून सोशल मीडियावर नेहमीच चर्चा रंगते. तशी ती आताही रंगली. रियाला अटक झाल्यानंतर आर्चरनं 6 डिसेंबर 2013मध्ये केलेलं ट्विट व्हायरल होऊ लागले आहे. त्यात त्यानं नुसतं 'रिया' असं लिहिलं होतं.  ( Jofra Archer old tweets goes viral )



याशिवाय अन्य ट्विटमध्ये, रिया तक्रार करत आहे आणि अजून बरेच काही बाहेर यायचं आहे. असं लिहिलं.  नेटिझन्सही रियाचे हे ट्विट रिट्विट करून त्याला पुन्हा एकदा भविष्यवक्ता म्हणून संबोधले आहे. 





रैना पळू नकोस!; सुरेश रैनाची आयपीएलमधून माघार अन् जोफ्रा आर्चरचं ट्विट व्हायरल
सुरेश रैना यानं IPL 2020मधून माघार घेतल्यानंतरही आर्चरचं ट्विट व्हायरल झालं होतं. सहा वर्षांपूर्वी त्यानं रैनासाठी एक ट्विट केलं होतं आणि आता ते व्हायरल होऊ लागलं आहे. नेटिझन्सनी रैनाच्या आयपीएलमधून माघार घेण्याचा आणि आर्चरच्या ट्विटचा संदर्भ जोडला आणि पुन्हा एकदा आर्चरची ज्योतिषाचार्य म्हणून चर्चा सुरू झाली.

अन्य महत्त्वाच्या बातम्या

 

22 परदेशी खेळाडूंना आणण्यासाठी फ्रँचायझींनी बुक केलं चार्टर्ड विमान; मोजली तगडी रक्कम!

Chennai Super Kingsचे दोन तगडे खेळाडू IPL 2020च्या पहिल्या सामन्याला मुकणार

मुंबई इंडियन्सनं मैदानावर उतरण्यापूर्वी CSKला नमवलं; घेतली मोठी भरारी! 

CSKच्या खेळाडूंचे मनोबल वाढवण्यासाठी MS Dhoniचा 'धाडसी' निर्णय; तुम्हीही कराल कौतुक

 मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंची समुद्रकिनारी सफर, Video 

राजस्थान रॉयल्सचा 'युवा' जोश; IPL 2020मध्ये यंग ब्रिगेड सर्वांवर भारी पडणार!

IPL 2020 पाहण्यापूर्वी यंदाच्या पर्वातील 10 नव्या गोष्टी नक्की जाणून घ्या!

 

Web Title: Sushant Singh Rajput girlfriend Rhea Chakraborty arrested, Jofra Archer old tweets goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.