Sri Lanka's World Cup captain, who has not been in the team for four years | चार वर्षांपासून संघात नसलेला खेळाडू झाला श्रीलंकेच्या विश्वचषकातील संघाचा कर्णधार
चार वर्षांपासून संघात नसलेला खेळाडू झाला श्रीलंकेच्या विश्वचषकातील संघाचा कर्णधार

नवी दिल्ली : गेल्या चार वर्षांपासून एखादा खेळाडू जर संघात नसेल तर तो संघाचा कर्णधार कसा असू शकतो, असा साधा प्रश्न तुम्हाला पडू शकतो. पण हा जर संघ विश्वचषकाचा असेल तर तुम्ही काय म्हणाल... पण श्रीलंकेच्या निवड समितीने मात्र क्रिकेट विश्वाला धक्का देणाऱ्या कर्णधाराची विश्वचषकासाठी निवड केली आहे. गेल्या चार वर्षांमध्ये दिमुथ करुणारत्ने एकही एकदिवसीय सामना खेळलेला नाही, पण तरीही त्याला विश्वचषकाच्या संघाचा कर्णधार करण्यात आलेला आहे.

विश्वचषकासाठी श्रीलंकेच्या संघाची आज घोषणा केली. या संघात काही माजी कर्णधारांचा समावेश आहे. त्याचबरोबर संघातील अनुभवी खेळाडूंना डावलून करुणारत्नेला संघाचे कर्णधारपद निवड समितीने दिले आहे.

श्रीलंकेचा 15 सदस्यीय संभाव्य संघ
दिमुथ करुणारत्ने (कर्णधार), अविष्का फर्नांडो, लाहिरू थिरिमाने, कुशल परेरा (विकेटकीपर), कुशल मेंडिस (विकेटकीपर), अँजेलो मॅथ्यूज, धनंजय डि'सिल्वा, जेफ्री वैंडेसरे, थिसारा परेरा, इसुरु उडाना, लसिथ मलिंगा, सुरंगा लकमल, नुवान प्रदीप, जीवन मेंडिस, मिलिंदा श्रीवर्दनाWeb Title: Sri Lanka's World Cup captain, who has not been in the team for four years
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.