श्रीलंकेच्या या अष्टपैलूने ठोकले सलग सहा षटकार, केली युवीच्या विक्रमाशी बरोबरी; १३ चेंडूत कुटल्या ५२ धावा 

Sri Lankan all-rounder Thisara Perera hit six sixes in a row : टी-२० क्रिकेट प्रस्थापित झाल्यापासून क्रिकेटमधील फटकेबाजी आणि वेगवान फलंदाजीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यामुळेच एकेकाळी क्रिकेटमध्ये क्वचितच दिसणारी षटकारांची आतषबाजी आता सातत्याने होताना दिसत असते.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2021 08:07 AM2021-03-29T08:07:18+5:302021-03-29T08:08:04+5:30

whatsapp join usJoin us
The Sri Lankan all-rounder Thisara Perera hit six sixes in a row, equaling Kelly Yuvi's record; 52 off 13 balls | श्रीलंकेच्या या अष्टपैलूने ठोकले सलग सहा षटकार, केली युवीच्या विक्रमाशी बरोबरी; १३ चेंडूत कुटल्या ५२ धावा 

श्रीलंकेच्या या अष्टपैलूने ठोकले सलग सहा षटकार, केली युवीच्या विक्रमाशी बरोबरी; १३ चेंडूत कुटल्या ५२ धावा 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

कोलंबो - टी-२० क्रिकेट प्रस्थापित झाल्यापासून क्रिकेटमधील फटकेबाजी आणि वेगवान फलंदाजीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यामुळेच एकेकाळी क्रिकेटमध्ये क्वचितच दिसणारी षटकारांची आतषबाजी आता सातत्याने होताना दिसत असते. श्रीलंकन क्रिकेटमधील अष्टपैलू असलेल्या थिसारा परेरानेही ( Thisara Perera ) काल, अशीच तुफानी आतषबाजी करत सिक्सर किंग युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. (The Sri Lankan all-rounder Thisara Perera hit six sixes in a row, equaling Kelly Yuvi's record; 52 off 13 balls)

रविवारी श्रीलंकेतील एका देशांतर्गत एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेमध्ये थिसारा परेराने हा विक्रम केला. परेराने श्रीलंका आर्मी स्पोर्ट्स संघाकडून खेळताना ब्लूमफिल्ड संघाविरुद्ध १३ चेंडूत ५२ धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान थिसारा परेराने आठ षटकार ठोकले. यातील सहा षटकार त्याने दिलन कोरे याने टाकलेल्या एका षटकात ठोकले. 

थिसारा परेराच्या या तुफानी खेळीच्या जोरावर श्रीलंका आर्मी स्पोट्स क्लबने ४१ षटकांत ३ बाद ३१८ धावा कुटल्या. त्यानंतर ब्लूमफिल्डने १७ षटकांत सहा बाद ७३ धावा जमवल्या. मात्र त्यानंतर खराब सूर्यप्रकाशामुळे पुढील खेळ होऊ शकला नाही. त्यामुळे हा सामना कुठल्याही निर्णयाविना रद्द करावा लागला.  
  
दरम्यान, देशांतर्गत क्रिकेटमध्ये सहा चेंडूत सहा षटकार ठोकणारा थिसारा परेरा हा श्रीलंकन क्रिकेटमधील पहिला फलंदाज बनला आहे. तर थिसारा परेराने १३ चेंडूत फटकावलेले अर्धशतक हे लिस्ट ए क्रिकेटमधील दुसरे सर्वात वेगवान शतक ठरले आहे. 

दरम्यान, आंतरराष्ट्रीय आणि स्थानिक क्रिकेटमध्ये आतापर्यंत नऊ फलंदाजांनी सलग सहा चेंडूत सहा षटकार खेचण्याची किमया केली आहे. त्या फलंदाजांमध्ये  गॅरी सोबर्स, रवी शास्त्री, हर्षेल गिब्ज, युवराज सिंग, रॉस व्हिटले, हझरतुल्ला झाझाई, लिओ क्रेटर, कायरन पोलार्ड आणि आता थिरासा परेरा हे या दुर्मिळ क्लबमध्ये दाखल झालेले मोजके फलंदाज आहेत. 

Web Title: The Sri Lankan all-rounder Thisara Perera hit six sixes in a row, equaling Kelly Yuvi's record; 52 off 13 balls

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.