SRH vs KKR Latest News : कोलकाता नाईट रायडर्सचा समाधानकारक पल्ला; हैदराबादच्या गोलंदाजांचा अचूक मारा

SRH vs KKR Latest News :  Indian Premier League ( IPL 2020) मध्ये आज सनरायझर्स हैदराबाद ( Sunrisers Hyderabad) संघानं नाणेफेक जिंकून कोलकाता नाईट रायडर्सला ( Kolkata Knight Riders) प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रण दिले.

By स्वदेश घाणेकर | Published: October 18, 2020 05:24 PM2020-10-18T17:24:03+5:302020-10-18T17:24:38+5:30

whatsapp join usJoin us
SRH vs KKR Latest News: Kolkata Knight Riders score 5/163 in 20 overs against sunrisers hyderabad | SRH vs KKR Latest News : कोलकाता नाईट रायडर्सचा समाधानकारक पल्ला; हैदराबादच्या गोलंदाजांचा अचूक मारा

SRH vs KKR Latest News : कोलकाता नाईट रायडर्सचा समाधानकारक पल्ला; हैदराबादच्या गोलंदाजांचा अचूक मारा

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Indian Premier League ( IPL 2020) मध्ये आज सनरायझर्स हैदराबाद ( Sunrisers Hyderabad) संघानं नाणेफेक जिंकून कोलकाता नाईट रायडर्सला ( Kolkata Knight Riders) प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रण दिले. राहुल त्रिपाठी आणि शुबमन गिल यांनी KKRला सावध सुरुवात करून दिली. पण, पॉवर प्लेच्या अखेरच्या चेंडूवर टी नटराजननं KKRला पहिला धक्का दिला. राहुल त्रिपाठी २३ धावांवर त्रिफळाचीत झाला. नितिश राणासह गिल SRHच्या गोलंदाजांचा सामना करत होता, परंतु त्यांच्या धावांचा वेग संथ वाटत होता. राशिद खाननं गिलला जीवदान दिले, परंतु १२व्या षटकांत राशिदनं त्याला बाद केले. प्रियम गर्गनं ( Priyam Garg) Stunning Running Catch घेतला. गिल ३७ चेंडूंत ५ चौकारांसह ३६ धावा करून माघारी परतला. विजय शंकरनं पुढील षटकात नितिश राणाला ( २९) बाद केले आणि त्याचाही झेल गर्गनं टिपला.


आंद्रे रसेलकडून पुन्हा अपेक्षा भंग झाला. टी नटराजननं फेकलेल्या १५ व्या षटकात रसेल (९) विजय शंकरच्या हाती झेल देऊन माघारी परतला. दिनेश कार्तिक आणि इयॉन मॉर्गन यांनी अखेरच्या षटकांत दमदार खेळ करताना कोलकाताला समाधानकारक पल्ला गाठून दिला. कोलकातानं ५ बाद १६३ धावा केल्या. कार्तिक-मॉर्गननं पाचव्या विकेटसाठी ५८ धावांची भागीदारी केली. कार्तिक १४ चेंडूंत २ चौकार व २ षटकारांसह २९ धावांवर नाबाद राहिला. मॉर्गननं २३ चेंडूंत ३ चौकार व १ षटकारासह ३४ धावा केल्या. 

Sunrisers Hyderabad XI: डेव्हिड वॉर्नर, जॉनी बेअरस्टो, मनीष पांडे, केन विलियम्सन, प्रियाम गर्ग, अहमद समद, विजय शंकर, राशिद खान, संदीप शर्मा, बसील थम्पी, टी नटराजन

Kolkata Knight Riders XI: राहुल त्रिपाठी, शुबमन गिल, नितिश राणा, दिनेश कार्तिक, इयॉन मॉर्गन, आंद्रे रसेल, पॅट कमिन्स, ल्युकी फर्ग्युसन, कुलदीप यादव, शिवम मावी, वरुण चक्रवर्थी 

Web Title: SRH vs KKR Latest News: Kolkata Knight Riders score 5/163 in 20 overs against sunrisers hyderabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.