SRH vs DC Latest News : वृद्धीमान सहा-डेव्हिड वॉर्नर यांनी आज पराक्रमच केला; IPLमध्ये केवळ तीनच जोडींना जमलाय हा विक्रम!

इंडियन प्रीमिअर लीगमध्ये ( IPL 2020) आतापर्यंत गोलंदाजाच्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर प्ले ऑफच्या शर्यतीत असलेल्या दिल्ली कॅपिटल्सच्या ( Delhi Capitals) गोलंदाजांची सनरायझर्स हैदराबाद ( Sunrisers Hyderabad) च्या सलामीवीरांनी धुलाई केली.

By स्वदेश घाणेकर | Published: October 27, 2020 08:49 PM2020-10-27T20:49:56+5:302020-10-27T20:50:19+5:30

whatsapp join usJoin us
SRH vs DC Latest News : Wriddhiman Saha and David Warner hit half century; Third time both openers scoring 50+ at SR of 190+ in IPL | SRH vs DC Latest News : वृद्धीमान सहा-डेव्हिड वॉर्नर यांनी आज पराक्रमच केला; IPLमध्ये केवळ तीनच जोडींना जमलाय हा विक्रम!

SRH vs DC Latest News : वृद्धीमान सहा-डेव्हिड वॉर्नर यांनी आज पराक्रमच केला; IPLमध्ये केवळ तीनच जोडींना जमलाय हा विक्रम!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

इंडियन प्रीमिअर लीगमध्ये ( IPL 2020) आतापर्यंत गोलंदाजाच्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर प्ले ऑफच्या शर्यतीत असलेल्या दिल्ली कॅपिटल्सच्या ( Delhi Capitals) गोलंदाजांची सनरायझर्स हैदराबाद ( Sunrisers Hyderabad) च्या सलामीवीरांनी धुलाई केली. IPL 2020मध्ये पहिलाच सामना खेळणाऱ्या वृद्धीमान सहानं ( Wriddhiman Saha) DCच्या गोलंदाजांना धुण्याची सुरुवात केली, मग दुसऱ्या बाजूला असलेल्या डेव्हिड वॉर्नरनेही ( David Warner) हात धूतले... वॉर्नरनं २५ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. कागिसो रबाडाच्या एका षटकात त्यानं २५ धावा केल्या. या दोघांच्या फटकेबाजीनं पहिल्या पॉवर प्लेमध्ये बिनबाद ७७ धावा चोपल्या. IPL 2020मधील पॉवर प्लेमधील ही सर्वोत्तम धावसंख्या आहे. 

वॉर्नर आणि सहा यांनी पहिल्या विकेटसाठी शतकी भागीदारी करून दिल्लीच्या गोलंदाजांचा पालापाचोळा केला. यंदाच्या मोसमात पॉवर प्लेमध्ये अर्धशतक करणारा वॉर्नर पहिलाच फलंदाज ठरला. आर अश्विननं दिल्लीला पहिले यश मिळवून दिले. वॉर्नर ३४ चेंडूंत ८ चौकार व २ षटकारांसह ६६ धावांवर माघारी परतला. SRHकडून आयपीएलमध्ये झालेल्या शतकी भागीदारींमध्ये १९वेळा वॉर्नरचा सहभाग आहे. वॉर्नर माघारी परतल्यानंतरही सहाचा झंझावात कायम होता. त्यानं २७ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केलं. सहाची फटकेबाजी पाहून तो आज शतक झळकावेल असेच वाटत होते, परंतु १५व्या षटकात त्याला बाद केले. 

अॅनरिच नॉर्ट्झेनं टाकलेल्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर सहाला स्लोवर चेंडूवर झेलबाद केले. सहानं ४५ चेंडूंत १२ चौकार व २ षटकारांसह ८७ धावा चोपल्या. सहाची ही आयपीएलमधील तिसरी सर्वोत्तम वैयक्तिक खेळी आहे. २०१४मध्ये त्यानं किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्ध नाबाद ११५ आणि २०१७मध्ये मुंबई इंडियन्सविरुद्ध नाबाद ९३ धावा चोपल्या होत्या. आयपीएलमध्ये १९०च्या स्ट्राईक रेटनं दोन्ही सलामीवीरांनी ५०+ धावा करण्याची ही तिसरी वेळ आहे. यापूर्वी ख्रिस गेल व विराट कोहली ( वि. किंग्स इलेव्हन पंजाब, २०१६) आणि ख्रिस लीन व सुनील नरीन ( वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, २०१७) यांनी अशी खेळी केली होती.  

Web Title: SRH vs DC Latest News : Wriddhiman Saha and David Warner hit half century; Third time both openers scoring 50+ at SR of 190+ in IPL

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.