सौरव गांगुली निवड समितीशी चर्चा करणार;  रवी शास्त्रींना नो एंट्री असणार

या बैठकीमध्ये भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांना बोलावले जाणार नसल्याचे म्हटले जात आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2019 05:36 PM2019-10-17T17:36:22+5:302019-10-17T17:36:50+5:30

whatsapp join usJoin us
Sourav Ganguly to discuss with selection committee; Ravi Shastri will have no entry | सौरव गांगुली निवड समितीशी चर्चा करणार;  रवी शास्त्रींना नो एंट्री असणार

सौरव गांगुली निवड समितीशी चर्चा करणार;  रवी शास्त्रींना नो एंट्री असणार

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबई : भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली आता बीसीसीआयचा अध्यक्ष होणार आहे. बीसीसीआयचे अध्यक्षपद सांभाळल्यावर गांगुली निवड समितीबरोबर चर्चा करणार आहे. या चर्चेमध्ये गांगुली आणि निवड समिती भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीबाबत विचार करू शकते, असे म्हटले जात आहे. पण या बैठकीमध्ये भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांना बोलावले जाणार नसल्याचे म्हटले जात आहे.
बीसीसीआयचे अध्यक्ष गांगुलीला वार्षिक सर्वसाधारण सभेनंतर देण्यात येणार आहे. ही सभा 23 ऑक्टोबरला होणार आहे. यापूर्वी निवड समतिची बैठक 21 ऑक्टबरला ठरवण्यात आली होती. पण आता बीसीसीआयच्या अध्यक्षपदाच्या निवडीनंतर ही सभा 24 ऑक्टोबरला होणार आहे. या बैठकीमध्ये शास्त्री यांना प्रवेश देण्यात येणार नसल्याचे म्हटले जात आहे.
गांगुली याबद्दल म्हणाला की, " रवी शास्त्री नसल्याचा या बैठकीवर काही परीणाम होणार नाही. कारण या बैठकीबाबत अजूनही कोणतेच मुद्दे ठरवण्यात आलेले नाहीत. या बैठकीमध्ये धोनीच्या भवितव्याबाबत चर्चा होणार आहे. त्याचबरोबर स्थानिक क्रिकेटबद्दलही आम्ही चर्चा करणार आहोत."
भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा ( बीसीसीआय) अध्यक्ष झाला आहे. त्यामुळे दहा महिन्यांच्या या कार्यकाळात गांगुली कोणते महत्त्वाचे निर्णय घेतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. येत्या 24 तारखेला गांगुलीच्या अध्यक्षतेखाली बीसीसीआयच्या नवनिर्वाचित सदस्यांची पहिली बैठक होणार आहे. या बैठकीत आगामी बांगलादेशविरुद्धच्या ट्वेंटी-20 मालिकेसाठीचा संघही निवडला जाणार आहे. पण, या बैठकीत एक महत्त्वाचा निर्णय दादा घेण्याची शक्यता आहे. कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनी याच्या भविष्याचा....

माजी कर्णधार धोनी आयसीसी वर्ल्ड कप स्पर्धेनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतून धोनीनं विश्रांती घेणं पसंत केलं. वर्ल्ड कप स्पर्धेदरम्यानच धोनीच्या निवृत्तीच्या चर्चा सुरू झाल्या होत्या, परंतु माहीनं त्याबाबत अद्याप स्पष्ट मत मांडलेले नाही. निवड समिती प्रमुख एमएसके प्रसाद आणि कर्णधार विराट कोहली यांनीही निवृत्तीचा निर्णय धोनी स्वतः घेईल असे, मत व्यक्त केले आहे. पण, आता गांगुलीच्या अक्ष्यक्षतेखाली होणाऱ्या पहिल्याच बैठकीत धोनीच्या भवितव्याचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेनंतर टीम इंडिया मायदेशात बांगलादेशविरुद्ध तीन सामन्यांची ट्वेंटी-20 मालिका खेळणार आहे. त्यानंतर दोन कसोटी सामने होतील. गांगुली म्हणाला,''24 तारखेला निवड समितीसोबत चर्चा करून मार्ग काढला जाईल. निवड समितीच्या डोक्यात नेमका काय विचार आहे, ते मी जाणून घेणार आहे. त्यानंतर मी माझं मत मांडेन. धोनीनं दीर्घ विश्रांती घेतली, तेव्हा मी या पदावर नव्हतो. त्यामुळे निवड समितीसोबतच्या पहिल्या बैठकीत मला नेमकं काय ते कळेल.''
38 वर्षीय धोनीच्या मनात काय आहे, हेही जाणून घेण्याचा प्रयत्न करणार असल्याचे गांगुलीनं सांगितलं. तो म्हणाला,''धोनीला काय हवंय हे पाहूया.''  

भारत-पाक द्विदेशीय मालिका होणार?
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील द्विदेशीय मालिकेला सुरुवात होणार की नाही, याबाबत गांगुली म्हणाला,''हा प्रश्न तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानच्या पंतप्रधानांना विचारा. आम्हाला त्यासाठी परवानगी घ्यावी लागेल. त्यामुळे आता आमच्याकडे या प्रश्नाच उत्तर नाही.''

Web Title: Sourav Ganguly to discuss with selection committee; Ravi Shastri will have no entry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.