Bad News: वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का; ऑलराउंडर झाला दुखापतग्रस्त

महाराष्ट्राच्या खेळाडूची संघात वर्णी...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2020 05:50 PM2020-01-10T17:50:20+5:302020-01-10T17:51:48+5:30

whatsapp join usJoin us
Siddhesh Veer to replace Divyansh Joshi in India’s U19 World Cup squad | Bad News: वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का; ऑलराउंडर झाला दुखापतग्रस्त

Bad News: वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का; ऑलराउंडर झाला दुखापतग्रस्त

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

टीम इंडिया आज ट्वेंटी-20 सामन्यात श्रीलंकेचा सामना करणार आहे. 2020मध्ये होणाऱ्या प्रत्येक ट्वेंटी-20 सामन्यात दमदार कामगिरी करून टीम इंडिया ऑस्ट्रेलियात होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेच्या तयारीला लागला आहे. या वर्षी तीन वर्ल्ड कप स्पर्धा होत आहेत. पण, वर्ल्ड कप स्पर्धेला सामोरे जाण्यापूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. संघातील अष्टपैलू खेळाडूला गंभीर दुखापत झाली आहे. त्यामुळे तो वर्ल्ड कप खेळणार नाही, अशी घोषणा भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं ( बीसीसीआय) केली आहे. टीम इंडियासाठी हा मोठा धक्का समजला जात आहे.

टीम इंडिया जेतेपद कायम राखण्यासाठी दक्षिण आफ्रिकेत दाखल झाली आहे. दक्षिण आफ्रिकेत 19 वर्षांखालील वन डे वर्ल्ड कप स्पर्धा खेळवण्यात येणार आहे.  भारतीय संघ वर्ल्ड कप स्पर्धेसाठी जोरदार तयारी करत असताना त्यांना शुक्रवारी मोठा धक्का बसला आहे. संघातील अष्टपैलू खेळाडू दिव्यांश जोशीला दुखापतीमुळे माघार घ्यावी लागली आहे. दक्षिण आफ्रिका आणि झिम्बाब्वे यांच्याविरुद्धच्या तिरंगी मालिकेतील पहिल्या सामन्यात दिव्यांशला दुखापत झाली. त्यामुळे त्याला  वर्ल्ड कप स्पर्धेतून माघार घ्यावी लागली आहे. त्याच्या जागी निवड समितीनं महाराष्ट्राच्या सिद्धेश वीरला संधी दिली आहे. दिव्यांशच्या उजव्या खांद्याला दुखापत झाली होती.  

भारतीय संघाने चार वेळा वर्ल्ड कप जिंकला आहे. 2000, 2008, 2012 आणि 2018मध्ये वर्ल्ड कप विजयाचा मान टीम इंडियानं पटकावला आहे. यावेळीही टीम इंडियाला जेतेपदाचा प्रबळ दावेदार मानला जात आहे. 2018मध्ये पृथ्वी शॉच्या नेतृत्वाखाली आणि दी वॉल राहुल द्रविड यांच्या मार्गदर्शनाखाली टीम इंडियानं जेतेपद पटकावले होते. यंदा प्रियम गर्गच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया मैदानावर उतरणार आहे. पण, भारतासाठी जेतेपद कायम राखणं इतकं सोपं नसेल. 

अ गट  - भारत, जपान, न्यूझीलंड आणि श्रीलंका
ब गट - ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, नायजेरिया आणि वेस्ट इंडिज
क गट - बांगलादेश, पाकिस्तान, स्कॉटलंड आणि झिम्बाब्वे
ड गट - अफगाणिस्तान, कॅनडा, दक्षिण आफ्रिका आणि संयुक्त अरब अमिराती

भारताचे सामने
19 जानेवारी - वि. श्रीलंका
21 जानेवारी - वि. जपान 
24 जानेवारी - वि. न्यूझीलंड

भारतीय संघ - प्रियम गर्ग ( कर्णधार),  ध्रुवचंद जुरेल ( उपकर्णधार-यष्टिरक्षक), यशस्वी जैस्वाल, तिलक वर्मा, दिव्यांश सक्सेना, शाश्वत रावत,  शुभंग  हेगडे, रवी विश्नोई, आकाश सिंग, कार्तिक त्यागी, अथर्व अंकोलेकर, कुमार कुशग्रा ( यष्टिरक्षक), सुशांत मिश्रा, विद्याधर पाटील, सिद्धेश वीर.
 

Web Title: Siddhesh Veer to replace Divyansh Joshi in India’s U19 World Cup squad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.