Shreyas Iyer, India vs South Africa: 'ऑलराऊंडर अय्यर'... व्यंकटेश नव्हे तर श्रेयसने केली गोलंदाजी; सोशल मीडियावर भन्नाट कमेंट्स

डी कॉक आणि डुसेन यांची जोडी फोडण्यासाठी श्रेयस अय्यर गोलंदाजी करण्यासाठी आला.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2022 05:29 PM2022-01-23T17:29:21+5:302022-01-23T17:30:51+5:30

whatsapp join usJoin us
Shreyas Iyer bowling in IND vs SA 3rd ODI match Social Media Fans go crazy see hilarious tweets photos | Shreyas Iyer, India vs South Africa: 'ऑलराऊंडर अय्यर'... व्यंकटेश नव्हे तर श्रेयसने केली गोलंदाजी; सोशल मीडियावर भन्नाट कमेंट्स

Shreyas Iyer, India vs South Africa: 'ऑलराऊंडर अय्यर'... व्यंकटेश नव्हे तर श्रेयसने केली गोलंदाजी; सोशल मीडियावर भन्नाट कमेंट्स

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

भारतीय कर्णधार केएल राहुलने नाणेफेक जिंकत यजमान आफ्रिकेला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. आफ्रिकेच्या फलंदाजांसाठी पहिल्या १५ षटकांचा खेळ काहीसा खराबच झाला. त्यानंतर क्विंटन डी कॉक आणि रॅसी वॅन डर डुसेन या दोघांनी धडाकेबाज खेळी केली. क्विंटन डी कॉकने शतकी तर वॅन डर डुसेनने अर्धशतकी खेळी केली. या दोघांमध्ये शतकी भागीदारीही झाली. त्यामुळे आजच्या सामन्यात भारताकडून एक नवीन गोष्ट पाहायला मिळाली. चक्क श्रेयस अय्यरने आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये गोलंदाजी केली आणि त्यानंतर सोशल मीडियावर भन्नाट मीम्स आणि ट्वीट्सही पाहायला मिळाली.

क्विंटन डी कॉक आणि डुसेन दोघेही फटकेबाजी करत होते. त्यामुळे भारताला ती भागीदारी तोडायची होती. अशा परिस्थितीत कर्णधार केएल राहुलने वेगवेगळे पर्याय चाचपडून पाहायला सुरूवात केले. त्याचवेळी अचानक श्रेयस अय्यर गोलंदाजी करताना दिसला. विशेष म्हणजे, उजव्या हाताच्या वॅन डर डुसेनसमोर त्याने लेग स्पिन गोलंदाजी केली. तर डावखुऱ्या डी कॉकला त्याने ऑफ स्पिन गोलंदाजी केली. या घटनेनंतर सोशल मीडियावर श्रेयस अय्यरची मोठ्या प्रमाणावर चर्चा रंगली. व्यंकटेश अय्यर अष्टपैलू आहे हे माहिती होतं पण श्रेयस अय्यरही अष्टपैलू आहे हे आजच कळलं अशा प्रकारच्या अनेक भन्नाट प्रतिक्रिया ट्वीटरवर पाहायला मिळाल्या. पाहा काही निवडक ट्वीट्स-

--

--

--

--

--

--

--

दरम्यान, त्यानंतर अखेर जसप्रीत बुमराहने ती जोडी फोडली. बुमराहने क्विंटन डी कॉकला १२४ धावांवर माघारी पाठवलं. त्यानंतर पुढच्याच षटकात वॅन डर डुसेनही ५२ धावा काढून झेलबाद झाला. त्यामुळे आफ्रिकेच्या धावगतीला थोडासा लगाम लावण्यात भारतीय गोलंदाजांना यश आले.

Web Title: Shreyas Iyer bowling in IND vs SA 3rd ODI match Social Media Fans go crazy see hilarious tweets photos

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.