स्टीव्ह स्मिथला चौथ्या चेंडूवर बाद करेन; Shoaib Akhtarच्या दाव्याची ICCनं उडवली खिल्ली

पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तर हा त्याच्या काळातील सर्वोत्तम गोलंदाज होता.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2020 05:04 PM2020-05-12T17:04:12+5:302020-05-12T17:05:07+5:30

whatsapp join usJoin us
Shoaib Akhtar claims he can dismiss Steve Smith in 4 balls; ICC hilariously trolls svg | स्टीव्ह स्मिथला चौथ्या चेंडूवर बाद करेन; Shoaib Akhtarच्या दाव्याची ICCनं उडवली खिल्ली

स्टीव्ह स्मिथला चौथ्या चेंडूवर बाद करेन; Shoaib Akhtarच्या दाव्याची ICCनं उडवली खिल्ली

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तर हा त्याच्या काळातील सर्वोत्तम गोलंदाज होता. त्याच्या वेगवान मारानं भल्याभल्या फलंदाजांना हतबल केले होते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात वेगानं मारा करण्याचा विक्रम अख्तरच्या नावावर आहे. दुसरीकडे ऑस्ट्रेलियाचा फलंदाज स्टीव्ह स्मिथ हा सध्याचा यशस्वी फलंदाज आहे. कसोटी फलंदाजांत स्मिथ अव्वल स्थानावर आहे. अशा या स्मिथला चौथ्या चेंडूवर बाद करण्याचा दावा अख्तरनं सोमवारी केला आणि आज आयसीसीनं त्याला ट्रोल केलं.
ESPN Cricinfo'sच्या एका ट्विटवर अख्तरनं स्मिथला चौथ्या चेंडूवर बाद करण्याचा दावा केला. 

माझा मुलगा एवढाही वयस्कर झालेला नाही; व्हायरल फोटोवर MS Dhoniच्या आईची प्रतिक्रिया

सचिन तेंडुलकरपेक्षा धावांचा पाठलाग करण्यात विराट कोहली सरस; एबी डिव्हिलियर्स


अख्तरनं 46 कसोटी आणि 163 वन डे साममन्यांत पाकिस्तानचे प्रतिनिधित्व केलं आहे. त्यानं कसोटीत 178 आणि वन डेत 247 विकेट्स घेतल्या होत्या. 2011मध्ये निवृत्ती घेणाऱ्या अख्तरनं 15 ट्वेंटी-20 सामन्यांत 19 विकेट्स घेतल्या आहेत.  त्यावरून आयसीसीनं आज पाकिस्तानी गोलंदाजाला ट्रोल केलं. 

वीरू, गंभीरला शिवीगाळ करू शकतो, पण...; Shoaib Akhtar पुन्हा बरळला
 

सोमवारी अख्तरनं भारताचा माजी सलामीवीर वीरूला खोटारडा म्हटलं होतं. पाकिस्तान दौऱ्यावर वीरूनं तिहेरी शतक झळकावलं होतं. त्यावेळचा 'बाप बाप होता है!' हा किस्सा वीरूनं अनेकदा सांगितला. त्यावरून अख्तरनं भारतीय फलंदाजाला खोटारडा ठरवलं. उलट वीरू जेव्हा प्रत्यक्ष भेटला तेव्हा असं काही न म्हटल्याचं त्यानं सांगितलं. यावरूनच टीव्हीसमोर आल्यावर तो काहीही बोलतो हे स्पष्ट होतं, असं अख्तर म्हणाला.

तो पुढे म्हणाला,''सेहवाग आणि गंभीर ही चांगली माणसं आहेत. पण, जेव्हा ते टीव्हीसमोर येतात तेव्हा जे तोंडात येईल ते बरळतात. मीही त्यांच्याप्रती अपमानजनक वक्तव्य करू शकतो आणि शिवीगाळही करू शकतो, परंतु मी असं करत नाही. कारण, लहान मुलंही कार्यक्रम पाहतात.''अन्य महत्त्वाच्या बातम्या

... म्हणून हा सर्व आटापिटा; IPL 2020 रद्द होणं BCCIला परवडणारं नाही!

85 वर्षीय आजीच्या निःस्वार्थ सेवेला मोहम्मद कैफचा सलाम; तुम्हालाही वाटेल अभिमान 

Video : MS Dhoniच्या नव्या लूकवर युजवेंद्र चहल म्हणतो, थाला वन मोर टाईम!

महेंद्रसिंग धोनीनं रागात बॅट फेकली अन् ड्रेसिंग रुममध्येही आदळआपट केली; इरफान पठाणनं सांगितला किस्सा 

2008 मध्ये धोनीने कप्तानपद सोडण्याची दिली होती धमकी?, आरपी सिंगने सांगितले यामागील सत्य! 

क्रिकेटपटू अन् बॉलिवूड अभिनेत्री यांच्या 14 बेस्ट रोमँटिक स्टोरी!

Web Title: Shoaib Akhtar claims he can dismiss Steve Smith in 4 balls; ICC hilariously trolls svg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.