भर रस्त्यात शिखर धवनने गाडी थांबवून दिले फ्लाइंग किस, पाहा व्हिडीओ...

क्षेत्ररक्षण करताना झेल पकडल्यावर धवन कबड्डी स्टाइलमध्ये सेलिब्रेशन करताना दिसतो. पण आता तो चर्चेत आला आहे तो भर रस्त्यावर गाडी थांबवून फ्लाइंग किस दिल्यामुळे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2019 03:23 PM2019-09-02T15:23:22+5:302019-09-02T15:24:03+5:30

whatsapp join usJoin us
Shikhar Dhawan given flying kiss on the road, watch the video ... | भर रस्त्यात शिखर धवनने गाडी थांबवून दिले फ्लाइंग किस, पाहा व्हिडीओ...

भर रस्त्यात शिखर धवनने गाडी थांबवून दिले फ्लाइंग किस, पाहा व्हिडीओ...

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नवी दिल्ली : भारताचा सलामीवीर शिखर धवनची सेलिब्रेशन करण्याची स्टाइल भन्नाट आहे. आपल्या सेलिब्रेशनसाठी धवन चाहत्यांमध्ये प्रसिद्ध आहे. मैदानात फलंदाजी करताना जर धवनने शतक झळकावले तर त्याची दोन्ही हात वर करण्याची निराळी पद्धत आहे. त्याचबरोबर क्षेत्ररक्षण करताना झेल पकडल्यावर धवन कबड्डी स्टाइलमध्ये सेलिब्रेशन करताना दिसतो. पण आता तो चर्चेत आला आहे तो भर रस्त्यावर गाडी थांबवून फ्लाइंग किस दिल्यामुळे.

सध्या भारतीय संघ वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर आहे. पण धवन हा भारताच्या संघात नसल्याने तो भारतामध्ये आहे. भारतामध्ये आज सकाळी धवन गाडीतून जात होता. तेव्हा त्याने एका व्यक्तीला फ्लाइंग किस दिल्याचे पाहायला मिळाले. धवन गाडी चालवत असताना रस्त्याच्या कडेला एक मुलगा उभा होता. त्या मुलाला धवनने किस दिल्याचे पाहायला मिळाले.

Web Title: Shikhar Dhawan given flying kiss on the road, watch the video ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.