India vs Australia, 2nd T20I : शिखर धवनची 'गब्बर' कामगिरी, मोडला सुरेश रैनाचा विक्रम

प्रत्युत्तरात लोकेश राहुल आणि शिखर धवन यांनी टीम इंडियाला सॉलिड सुरुवात करून दिली. राहुल व धवन यांनी पहिल्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली, परंतु सहाव्या षटकात अँड्य्रू टायनं भारताला धक्का दिला.

By स्वदेश घाणेकर | Published: December 6, 2020 04:28 PM2020-12-06T16:28:26+5:302020-12-06T16:28:57+5:30

whatsapp join usJoin us
Shikhar Dhawan break Suresh Raina record, score most runs by an Indian left-handed batsman in T20Is | India vs Australia, 2nd T20I : शिखर धवनची 'गब्बर' कामगिरी, मोडला सुरेश रैनाचा विक्रम

India vs Australia, 2nd T20I : शिखर धवनची 'गब्बर' कामगिरी, मोडला सुरेश रैनाचा विक्रम

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

 India vs Australia, 2nd T20I: प्रमुख खेळाडू दुखापतीमुळै मैदानाबाहेर असून ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी दुसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यात दमदार खेळ केला. मॅथ्यू वेड ( Matthew Wade) व डी'आर्सी शॉर्ट यांनी संघाला दमदार सुरूवात करून दिली. वेडच्या फटकेबाजीनंतर स्टीव्हन स्मिथनं आक्रमक खेळ केला आणि ऑस्ट्रेलियानं भारतासमोर तगडं आव्हान ठेवलं. प्रत्युत्तरात लोकेश राहुल आणि शिखर धवन यांनी दमदार सुरुवात करून दिली. धवननं टीम इंडियाचा माजी अष्टपैलू खेळाडू सुरेश रैना याचा विक्रम मोडला. 

फिंचच्या अनुपस्थितीत नेतृत्वाची जबाबदारी मिळालेल्या मॅथ्यू वेडनं डी'आर्सी शॉर्टसह डावाची सुरुवात केली.  ८व्या षटकात वॉशिंग्टन सुंदरच्या गोलंदाजीवर वेडचा सोपा झेल विराट कोहलीकडून सुटला. वेडलाही वाटलं होतं की हा झेल टिपला जाईल आणि त्यामुळे तो क्रिज सोडून बराच पुढे आला होता. विराटनं लगेच चेंडू थ्रो करून वेडला धावबाद केले. वेडनं ३२ चेंडूंत १० चौकार व १ षटकार खेचून ५८ धावा केल्या. त्यानंतर आलेल्या ग्लेन मॅक्सवेलनं १३ चेंडूंत २ षटकारांसह २२ धावा केल्या. शार्दूल ठाकूरनं त्याला बाद केलं. 
मोइजेस हेन्रीक्स याच्यासह स्मिथनं ४७ धावा जोडल्या.  स्मिथ ३८ चेंडूंत ३ चौकार व २ षटकार खेचून ४६ धावांवर युजवेंद्र चहलच्या गोलंदाजीवर बाद झाला. हेन्रीक्सही 18 चेंडूंत 26 धावा करून टी नटराजनच्या गोलंदाजीवर बाद झाला. नटराजननं 19 धावांत 2 विकेट्स घेतल्या. ऑस्ट्रेलियानं 5 बाद 194 धावा केल्या.

प्रत्युत्तरात लोकेश राहुल आणि शिखर धवन यांनी टीम इंडियाला सॉलिड सुरुवात करून दिली. राहुल व धवन यांनी पहिल्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली, परंतु सहाव्या षटकात अँड्य्रू टायनं भारताला धक्का दिला. राहुल २२ चेंडूंत २ चौकार व १ षटकार मारून ३० धावांवर झेलबाद झाला. त्यानंतर धवननं फटकेबाजी करताना सुरेश रैनाचा विक्रम मोडला. भारताकडून आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-20त सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम धवननं नावावर केला. तसेच ट्वेंटी-२०त १० अर्धशतक  झळकावणारा तो एकमेव फलंदाज आहे. 

शिखर धवन  - १६२८*
सुरेश रैना - १६०५
युवराज सिंग - ११७७
गौतम गंभीर - ९३२
रिषभ पंत - ४१०  
 

Web Title: Shikhar Dhawan break Suresh Raina record, score most runs by an Indian left-handed batsman in T20Is

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.