माझ्या करिअरमध्ये 'या' क्रिकेटरचं मोठं योगदान, बुमराह थेट न्यूझीलंडच्या वेगवान गोलंदाजाला दिलं यशाचं श्रेय 

मुंबई इंडियन्सने प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओत बुमराह म्हणाला, ‘मी नेहमी बॉंडकडून टिप्स घेतो.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2021 10:00 AM2021-05-15T10:00:27+5:302021-05-15T10:02:04+5:30

whatsapp join usJoin us
Shane bond big contribution in my career says Bumrah | माझ्या करिअरमध्ये 'या' क्रिकेटरचं मोठं योगदान, बुमराह थेट न्यूझीलंडच्या वेगवान गोलंदाजाला दिलं यशाचं श्रेय 

माझ्या करिअरमध्ये 'या' क्रिकेटरचं मोठं योगदान, बुमराह थेट न्यूझीलंडच्या वेगवान गोलंदाजाला दिलं यशाचं श्रेय 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबई : माझ्या कारकिर्दीला झळाळी देण्यात न्यूझीलंडचा माजी वेगवान गोलंदाज व मुंबई इंडियन्सचा गोलंदाजी प्रशिक्षक शेन बॉंड याचे मोठे योगदान असल्याचे गोलंदाज जसप्रीत बुमराह याने म्हटले.

मुंबई इंडियन्सने प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओत बुमराह म्हणाला, ‘मी नेहमी बॉंडकडून टिप्स घेतो. प्रत्येकवर्षी शिकण्याचा प्रयत्न करतो आणि पुढेदेखील काही नव्या गोष्टी आत्मसात करण्याचा प्रयत्न असेल.  बाँड आणि माझ्यात फार चांगले संबंध असून, बॉंड खेळत असतानापासून मी त्याच्या गोलंदाजीचा चाहता राहिलो आहे. आता देशाकडून खेळताना अनेकदा त्याचे मार्गदर्शन घेतो. सर्वप्रथम २०१५ला मी बॉंडला भेटलो. लहान असताना त्याची गोलंदाजी पाहणे रोमहर्षक होते. मैदानावर नेमके काय करायचे याबद्दल बॉंडने मला वारंवार मदत केली.’
 

Web Title: Shane bond big contribution in my career says Bumrah

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.