निवड समिती अध्यक्षांनी शेवटच्या बॉलवर मारला सिक्सर, सांगितली 'ही' गोष्ट...

एमएसके प्रसाद यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीचा कार्यकाळ संपत आला आहे. आज या निवड समितीने अखेरचा संघ निवडला. यानंतर निवड समितीला कार्यकाळ संपल्यामुळे संघ निवडता येणार नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2019 07:40 PM2019-12-23T19:40:46+5:302019-12-23T19:41:33+5:30

whatsapp join usJoin us
Selection committee chairman hits the last ball Six; say 'this' thing ... | निवड समिती अध्यक्षांनी शेवटच्या बॉलवर मारला सिक्सर, सांगितली 'ही' गोष्ट...

निवड समिती अध्यक्षांनी शेवटच्या बॉलवर मारला सिक्सर, सांगितली 'ही' गोष्ट...

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्दे या संघ निवडीनंतर प्रसाद यांनी एक वाक्य म्हणत सर्वांचीच मने जिंकून घेतली आहेत.

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाच्या निवड समिती अध्यक्षांचा कार्यकाळ संपत आला आहे. त्यामुळे आज अखेरचा संघ निवडताना अध्यक्षांनी थेट षटकारच ठोकल्याचे पाहायला मिळाले.

Image result for msk prasad

एमएसके प्रसाद यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीचा कार्यकाळ संपत आला आहे. आज या निवड समितीने अखेरचा संघ निवडला. यानंतर निवड समितीला कार्यकाळ संपल्यामुळे संघ निवडता येणार नाही. या संघ निवडीनंतर प्रसाद यांनी एक वाक्य म्हणत सर्वांचीच मने जिंकून घेतली आहेत.

Image result for msk prasad

संघाची निवड केल्यानंतर पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना प्रसाद म्हणाले की, " भारतीय संघाची चांगलीच घडी बसलेली आहे. त्यामुळे भारताला पुढील ६-७ वर्षांमध्ये कसलीही चिंता नाही. टेस्ट, वनडे आणि ट्वेन्टी-२० या तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये भारताचा संघ बलाढ्य आहे."

भारताचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराहचे ट्वेंटी-20 आणि वन डे संघात पुनरागमन झाले आहे. श्रीलंकेविरुद्धच्या तीन ट्वेंटी-20 आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या 3 वन डे सामन्यांसाठी बीसीसीआयनं सोमवारी संघ जाहीर केला. रोहित शर्मा आणि मोहम्मद शमी यांना विश्रांती देण्यात आली आहे. तर शिखर धवनची ट्वेंटी-20 आणि वन डे मालिकेत वापसी झाली आहे. रोहित व शमी ट्वेंटी-20 मालिकेत खेळणार नाही.

टीम इंडियाचा हिटमॅन रोहित शर्मानं 2019 वर्ष गाजवलं. भारताच्या मर्यादित षटकाच्या संघाचा उपकर्णधार रोहितनं कॅलेंडर वर्षात वन डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांचा विक्रम नावावर केला. 2019 या कॅलेंडर वर्षात वन डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांत रोहित शर्मा 1490 धावांसह आघाडीवर आहे. इंग्लंडमध्ये झालेल्या वर्ल्ड कप स्पर्धेतही त्यानं पाच शतकं झळकावली होती. ट्वेंटी-20तही त्यानं समाधानकारक कामगिरी केली आहे. रोहित एक वर्ष सातत्यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत आहे आणि त्यामुळे त्याला विश्रांती देण्यात आली आहे. 

शिखर धवन ऑगस्टमध्ये टीम इंडियाकडून शेवटचा वन डे सामना खेळला होता. त्यानंतर दुखापतीमुळे तो बाहेर होता. आता तोही कमबॅक करणार आहे. बुमराहनेही दक्षिण आफ्रिकेच्या मालिकेपूर्वी माघार घेतली होती. त्यानंतर तो उपचारासाठी लंडनमध्येही गेला होता. संजू सॅमसनला ट्वेंटी-20 संघात पुन्हा स्थान मिळाले आहे.

श्रीलंकेविरुद्ध टीम इंडिया कधी व कुठे भिडणार?

2020च्या पहिल्याच महिन्यात भारत आणि श्रीलंका यांच्यात 3 सामन्यांची ट्वेंटी-20 मालिका होणार आहे. 5, 7 आणि 10 जानेवारीला हे सामने अनुक्रमे गुवाहाटी, इंदूर आणि पुणे येथे खेळविण्यात येणार आहेत. त्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन सामन्यांची वन डे मालिका खेळवण्यात येईल.

श्रीलंकेविरुद्धच्या ट्वेंटी-20 मालिकेसाठी टीम इंडिया
विराट कोहली, शिखर धवन, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, रिषभ पंत, रवींद्र जडेजा, शिवम दुबे, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, नवदीप सैनी, शार्दूल ठाकूर, मनिष पांडे, वॉशिंग्टन सुंदर, संजू सॅमसन
 

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वन डे मालिकेचे वेळापत्रक 
14 जानेवारी - मुंबई
17 जानेवारी - राजकोट
19 जानेवारी - बंगळुरू 

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी टीम इंडिया
विराट कोहली, शिखर धवन, रोहित शर्मा, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, मनिष पांडे, रिषभ पंत. केदार जाधव, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, नवदीप सैनी, शार्दूल ठाकूर, जसप्रीत बुमराह.

Web Title: Selection committee chairman hits the last ball Six; say 'this' thing ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.