मदतनिधी सामन्यात सचिन तेंडुलकर, कोर्टनी वॉल्श प्रशिक्षकांच्या भूमिकेत

भारताचा दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर व वेस्टइंडिजच्या दिग्गज वेगवान गोलंदाज कोर्टनी वॉल्श प्रशिक्षकांची भूमिका बजावणार आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2020 04:58 AM2020-01-22T04:58:17+5:302020-01-22T04:59:20+5:30

whatsapp join usJoin us
Sachin Tendulkar, Courtney Walsh as coach | मदतनिधी सामन्यात सचिन तेंडुलकर, कोर्टनी वॉल्श प्रशिक्षकांच्या भूमिकेत

मदतनिधी सामन्यात सचिन तेंडुलकर, कोर्टनी वॉल्श प्रशिक्षकांच्या भूमिकेत

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

सिडनी : आॅस्ट्रेलियात लागलेल्या जंगलातील आगीमुळे प्रभावित झालेल्यांना मदत करण्यासाठी खेळण्यात येणाऱ्या विशेष सामन्यासाठी भारताचा दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर व वेस्टइंडिजच्या दिग्गज वेगवान गोलंदाज कोर्टनी वॉल्श प्रशिक्षकांची भूमिका बजावणार आहेत.

रिकी पॉँटिंग इलेव्हन व शेन वॉर्न इलेव्हन या दोन संघादरम्यान बुशफायर क्रिकेट बॅश सामना ८ फेबु्रवारीला रंगणार आहे. या सामन्यात रिकी पॉटिंग, शेन वॉर्न, जस्टीन लॅँगर, अ‍ॅडम गिलख्रिस्त, ब्रेट ली, शेन वॉटसन, मायकल क्लार्क, एलेक्स ब्लॅकवेल यांसारखे दिग्गज खेळाडू सहभागी होतील.

क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे कार्यकारी अधिकारी केविन रॉबर्टस यांनी सचिन व वॉल्श यांच्या सहभागाचे स्वागत करताना, ‘या दोन्ही खेळाडूंची आम्ही आतुरतेने वाट पहात आहोत. या सामन्यातून मिळणारी रक्कम आॅस्ट्रेलियन रेडक्रॉस संघटनेला दिली जाईल,’ असे सांगितले. (वृत्तसंस्था)

Web Title: Sachin Tendulkar, Courtney Walsh as coach

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.