Rohit Sharma can take Virat Kohli's place in the series against the West Indies | वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेसाठी रोहित शर्मा घेऊ शकतो कोहलीची जागा
वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेसाठी रोहित शर्मा घेऊ शकतो कोहलीची जागा

मुंबई : विश्वचषकानंतर आता भारताचा संघ दोन हात करणार आहे ते वेस्ट इंडिजबरोबर.भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये दोन कसोटी सामने आणि प्रत्येकी तीन एकदिवसीय व ट्वेन्टी-20 सामने खेळवण्यात येणार आहेत. या सामन्यांसाठी संघ निवडताना युवा खेळाडूंना जास्त संधी देण्यात येणार असल्याचे म्हटले जात आहे. 

या मालिकांसाठी विराट कोहलीऐवजी रोहित शर्माकडे संघाचे नेतृत्व देण्यात येऊ शकते, असे म्हटले जात आहे. कारण कोहलीने या सामन्यांमध्ये न खेळण्याची इच्छा व्यक्त केली होती. पण विश्वचषकानंतर आपण या सामन्यांमध्ये खेळण्यात तयार आहोत, असे कोहलीने सांगितल्याचे म्हटले जात आहे. 

संभाव्य संघ असा असू शकतो
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, श्रेयस अय्यर, शुभमन गिल, मयंक अग्रवाल, कृणाल पंड्या, केदार जाधव, रिषभ पंत, हार्दिक पंड्या, मनीष पांडे, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, आवेश खान, खलील अहमद आणि दीपक चहर.

वेस्ट इंडिजची संघ निवड लांबणीवर
वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकांसाठी शुक्रवारी भारताच्या संघाची निवड करण्यात येणार होती. पण आता भारतीय संघाची निवड पुढे ढकलण्यात आली आहे. पण निवड समितीची बैठक पुढे ढकलण्याचे नेमकं कारण आहे तरी काय...

आज भारतामध्ये कर्णधार विराट कोहली आणि माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी दाखल झाले. त्यामुळे भारताची संघ निवड पुढे ढकलल्याचे म्हटले जात आहे. कारण संघ निवडीपूर्वी या मालिकेमध्ये हे दोन खेळाडू खेळणार की त्यांना विश्रांती हवी आहे, हे निवड समितीला जाणून घ्यायचे आहे. त्याचबरोबर काही जणांच्या मते निवड समितीला धोनीबरोबर त्याच्या निवृत्तीबाबत चर्चा करायची आहे, असेही म्हटले जात आहे. त्यामुळे निवड समितीने काही दिवसांनंतर निवड समितीची बैठक घेण्याचे ठरवले आहे.

निवड समितीची बैठक पुढे ढकलण्यामागे काही तांत्रिक गोष्टी असल्याचेही म्हटले जात आहे. बीसीसीआय, क्रिकेट प्रशासकीय समिती आणि अन्य काही पदाधिकाऱ्यांनी काही तांत्रिक मुद्दे उपस्थित केले आहेत. त्यामुळे निवड समितीची बैठक पुढे ढकलली असल्याचे म्हटले जात आहे.

आता कधी होणार बैठक
शुक्रवारी होणारी निवड समितीची बैठक आता पुढे ढकलण्यात आली आहे. ही बैठक आता शनिवारी किंवा रविवारी होऊ शकते. त्यावेळीही संघ जाहीर केला जाऊ शकतो. पण काही जणांच्या मते सोमवारी वेस्ट इंडिजविरुद्धचा भारतीय संघ जाहीर होईल, असे म्हटले जात आहे.


Web Title: Rohit Sharma can take Virat Kohli's place in the series against the West Indies
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.