‘God ji’!, हातावर 'सुई' टोचून सचिन तेंडुलकर आज इंग्लंडविरुद्ध मैदानावर उतरणार; वीरूनं पोस्ट केला Video

Road Safety World Series : Virender Sehwag posts video वीरेंद्र सेहवागनं ( Virender Sehwag) एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला. त्यात सचिन तेंडुलकर आणि युवराज सिंग ( Yuvraj Singh) हेही दिसत आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2021 01:06 PM2021-03-09T13:06:46+5:302021-03-09T13:07:19+5:30

whatsapp join usJoin us
Road Safety World Series : Virender Sehwag posts an adorable video with ‘God ji’ Sachin Tendulkar | ‘God ji’!, हातावर 'सुई' टोचून सचिन तेंडुलकर आज इंग्लंडविरुद्ध मैदानावर उतरणार; वीरूनं पोस्ट केला Video

‘God ji’!, हातावर 'सुई' टोचून सचिन तेंडुलकर आज इंग्लंडविरुद्ध मैदानावर उतरणार; वीरूनं पोस्ट केला Video

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

रोड सेफ्ट वर्ल्ड सीरिजमधील ( Road Safety World Series ) टीम इंडियाचा दुसरा सामना आज रंगणार आहे. इंग्लंड लिजंड संघाविरुद्ध होणाऱ्या या सामन्यापूर्वी वीरेंद्र सेहवागनं ( Virender Sehwag) एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला. त्यात सचिन तेंडुलकर आणि युवराज सिंग ( Yuvraj Singh) हेही दिसत आहेत. या व्हिडीओत सचिन तेंडुलकर आणि युवराज सिंग मस्ती करताना दिसत आहेत. तेंडुलकरनं हातावर सुई टोचल्याचे दिसत आहे. हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. WTC Final : टीम इंडियाला जागतिक कसोटीच्या फायनलमध्ये पोहोचवणारे ६ खेळाडू न्यूझीलंडविरुद्धच्या ऐतिहासिक सामन्याला मुकणार?

सचिन तेंडुलकर त्याच्या फिजिओ सोबत बसला आहे. सहवाग म्हणाला की, ''बघा आमचे देवता. क्रिकेट खेळण्यासाठी ते काय काय करत आहेत ते पाहा.. हाताला सुई लावून ते मॅच खेळणार आहेत.''त्यानंतर वीरूनं कॅमेरा युवराज सिंगकडे नेला आणि सचिनच्या या क्रिकेट भावनेबद्दल विचारले. त्यावर युवी म्हणाला,''भाई तू शेर आहेस, पण ते बब्बर शेर आहेत.'' युवीचं हे उत्तर ऐकून वीरू हसू लागला. त्यानंतर वीरूनं सचिनकडे मोर्चा वळवला. त्यावर सचिन म्हणाला,''मी आज सामना खेळणार, हे शक्य आहे.'' संजना गणेशनसोबत लग्नाचे वृत्त असताना व्हायरल झाला जसप्रीत बुमराहचा 'तो' Video

पाहा व्हिडीओ... 

पहिल्या सामन्यात वीरूनं केलेली जबरदस्त फटकेबाजी 
इंडिया लिजंड्स संघानं सलामीच्या सामन्यात बांगलादेश लिजंड्स संघावर १० विकेट्सनं विजय मिळवला होता. त्या सामन्यात वीरूनं ३५ चेंडूंत १० चौकार व ५ षटकार खेचून नाबाद ८० धावा केल्या होत्या. सचिननं २६ चेंडूंत नाबाद ३३ धावा केल्या होत्या.  वीरेंद्र सेहवागची आतषबाजी, 15 चेंडूंत 70 धावा; सचिन तेंडुलकरसह 10.1 षटकांत जिंकला सामना

Web Title: Road Safety World Series : Virender Sehwag posts an adorable video with ‘God ji’ Sachin Tendulkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.