Road safety world series final: इंडिया लिजेंड्सने श्रीलंकेला पाणी पाजले; अंतिम सामन्यात १४ धावांनी मिळवला विजय

Road safety world series final: युवी आणि युसूफ पठाणच्या अर्धशतकांच्या जोरावर इंडिया लिजेंड्स संघाने २० षटकांत ४ बाद १८१ धावा कुटत श्रीलंका लिजेंड्स संघासमोर १८२ धावांचे आव्हान ठेवले होते. 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2021 10:58 PM2021-03-21T22:58:29+5:302021-03-21T23:05:59+5:30

whatsapp join usJoin us
Road safety world series final: India Legends win the Road safety world series final | Road safety world series final: इंडिया लिजेंड्सने श्रीलंकेला पाणी पाजले; अंतिम सामन्यात १४ धावांनी मिळवला विजय

Road safety world series final: इंडिया लिजेंड्सने श्रीलंकेला पाणी पाजले; अंतिम सामन्यात १४ धावांनी मिळवला विजय

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीजच्या अंतिम फेरीत आज इंडिया लिजेंड्स संघाकडून युवराज सिंग आणि युसूफ पठाण यांनी तुफानी फटकेबाजी करून श्रीलंकन लिजेंड्स गोलंदाजांची धुलाई केली. (Road safety world series final) आघाडीचे तीन फलंदाज ठरावीक अंतराने बाद झाल्यानंतर जबरदस्त फॉर्ममध्ये असलेला युवराज सिंग आणि युसूफ पठाणने जबरदस्त फलंदाजी करून इंडिया लिजेंड्सला सुस्थितीत नेले. युवी आणि युसूफ पठाणच्या अर्धशतकांच्या जोरावर इंडिया लिजेंड्स संघाने २० षटकांत ४ बाद १८१ धावा कुटत श्रीलंका लिजेंड्स संघासमोर १८२ धावांचे आव्हान ठेवले होते. 

इंडिया लिजेंड्स दिलेल्या धावांचा पाठलाग करताना श्रीलंका लिजेंड्सने चांगली सुरुवात केली. श्रीलंकेच्या सनथ जयसुर्या आणि कर्णधार तिलकरत्न दिलशानने चांगली सुरुवात केली. मात्र इंडिया लिजेंड्सचा अष्टपैलू खेळाडू युसूफ पठाणने जयसूर्याला बाद केले. जयसूर्याने ३५ चेंडूत ४३ धावा केल्या. यानंतर दिलशान देखील बाद झाला. दिलशानने १८ चेंडूत २१ धावा केल्या. इरफान पठाणने देखील दोन बळी घेतल्या. त्यामुळे इंडिया लिजेंड्सचा विजयाचा मार्ग सोपा झाला. इंडिया लिजेंड्सने श्रीलंकेला १४ धावांनी पराभूत करत रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीज आपल्या नावावर केली. 

तत्पूर्वी, या सामन्यात श्रीलंका लिजेंड्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीराकले. त्यानंतर इंडिया लिजेंड्स संघाची सुरुवात चांगली झाली नाही. वीरेंद्र सेहवाग १० धावा काढून हेराथची शिकार झाला. तर बद्रिनाथला अनुभवी जयसूर्याने परतीची वाट दाखवली. त्यानंतर कर्णधार सचिन तेंडुलकरने युवराज सिंगसोबत डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र सचिनही ३० धावा काढून महरुफची शिकार झाल्याने भारताची अवस्था ३ बाद ७८ अशी झाली.

आघाडीचे तीन फलंदाज माघारी परतल्यावर युवराज सिंग (६० धावा) आणि युसूफ पठाण (नाबाद ६२ धावा) यांनी मोर्चा सांभाळला. दोघांनीही षटकार चौकारांची बरसात करत चौथ्या विकेटसाठी ४७ चेंडून ८५ धावा कुटल्या. या भागीदारीच्या जोरावर इंडिया लिजेंड्सने २० षटकांत १८१ धवा फटकावण्यात यश मिळवले.

Web Title: Road safety world series final: India Legends win the Road safety world series final

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.