Rishi Kapoor has a question for India’s World Cup squad, asks ‘why most of our cricketers sport beards?’ | ICC World Cup 2019: 'बिच्चारा धोनी' टीम इंडियात पडला एकाकी ; ऋषी कपूर यांचं ट्विट व्हायरल
ICC World Cup 2019: 'बिच्चारा धोनी' टीम इंडियात पडला एकाकी ; ऋषी कपूर यांचं ट्विट व्हायरल

मुंबई, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : आगामी वर्ल्ड कप स्पर्धेसाठी बीसीसीआयने सोमवारी भारतीय संघाची घोषणा केली. 15 सदस्यीय संघाचे नेतृत्व कर्णधार विराट कोहली करणार असून रोहित शर्मा उपकर्णधार असणार आहे. सोशल मीडियावर काल दिवसभर भारताचा वर्ल्ड कप संघ हाच ट्रेंडिग टॉपिक होता. बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता ऋषी कपूर यांनी नेहमीप्रमाणे याही ट्रेंडिंग टॉपिकवर आपले मत व्यक्त केले. त्यांच्या या एका ट्विटने सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली. 

वर्ल्ड कप स्पर्धेसाठी जाहीर करण्यात आलेल्या संघातील खेळाडूंची दाढीवरून ऋषी कपूर यांनी फिरकी घेतली. त्यांनी 15 खेळाडूंचा एकत्रित फोटो ट्विट केला आणि त्यावर प्रश्न विचारला. त्यांनी लिहीले की,''आपल्या संघातील अनेक खेळाडूंनी दाढी का ठेवली आहे? '' कपूर यांनी शेअर केलेल्या फोटोत माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी वगळता सर्व खेळाडूंची दाढी होती. मग काय त्यांच्या या ट्विटवर चांगलीच चर्चा रंगली. 
 ऋषि कपूर यांचे निरिक्षण अचूक असल्याची प्रतिक्रिया नेटिझन्सनी दिली. तर काहींनी सर्व खेळाडू कर्णधार विराट कोहलीच्या पावलावर पाऊल टाकून चालत असल्याचे मत व्यक्त केले. यात धोनी मात्र अपवाद आहे. ऋषी कपूर सध्या न्यूयॉर्कमध्ये उपचार घेत आहेत.


Web Title: Rishi Kapoor has a question for India’s World Cup squad, asks ‘why most of our cricketers sport beards?’
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.