Ind vs Eng: रिषभ पंत स्पायडरमॅन होऊन धमाल करतो तेव्हा...; VIDEO व्हायरल

India vs England, 3rd Test, Ahmedabad:  रिषभ पंतच्या (Rishabh Pant) विनोदी अंदाजाची सोशल मीडियात जोरदार चर्चा.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2021 03:34 PM2021-02-20T15:34:27+5:302021-02-20T15:36:43+5:30

whatsapp join usJoin us
rishabh Pant Again Become Spiderman This Time During Team Gym Session india vs england 3rd test Ahmedabad | Ind vs Eng: रिषभ पंत स्पायडरमॅन होऊन धमाल करतो तेव्हा...; VIDEO व्हायरल

Ind vs Eng: रिषभ पंत स्पायडरमॅन होऊन धमाल करतो तेव्हा...; VIDEO व्हायरल

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs England, 3rd Test, Ahmedabad: भारतीय संघातील यष्टीरक्षक रिषभ पंतचा (Rishabh Pant )ऑस्ट्रेलिया दौऱ्यावेळी एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला होता. त्यानंतर रिषभला भारतीय संघाचा स्पायडरमॅन म्हणून संबोधलं जाऊ लागलं. ऑस्ट्रेलियाच्या ब्रिस्बेन कसोटीत यष्टीरक्षण करत असताना रिषभ पंत "स्पायडर मॅन, स्पायडर मॅन...तुमने चुराया मेरा दिला चेन" हे गाणं गुणगुणत असतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. रिषभच्या या विनोदी अंदाजाची सोशल मीडियात जोरदार चर्चा झाली होती. आता पुन्हा एकदा रिषभचा असाच एक धमाल व्हिडिओ समोर आला आहे. (Rishabh Pant Again Become Spiderman This Time During Team Gym Session)

इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघ सध्या अहमदाबादमधील मोटेरा स्टेडियममध्ये सराव करत आहे. २४ फेब्रुवारीपासून भारत विरुद्ध इंग्लंड तिसरा कसोटी सामना खेळविण्यात येणार आहे आणि यासाठी दोन्ही संघ मैदानात घाम गाळताना दिसत आहेत. पण याच दरम्यान मोटेरा स्टेडियमच्या जीममध्ये व्यायाम करत असताना रिषभ पंतनं एकच धमाल उडवून दिली. रिषभच्या या हटके अंदाजाचा व्हिडिओ वॉशिंग्टन सुंदर यानं त्याच्या मोबाइलमध्ये टिपला आणि सोशल मीडियावर शेअर केला आहे. ''स्पायडरमॅन'' गाण्यावर रिषभ पंत जीममध्ये स्पायडरमॅनच्या अंदाजात व्यायाम करताना दिसतोय. रिषभच्या या व्हिडिओचीही सोशल मीडियात जोरदार चर्चा होत आहे. 

Web Title: rishabh Pant Again Become Spiderman This Time During Team Gym Session india vs england 3rd test Ahmedabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.