मला संघातून रिलिज करा, धोनीने सीएसकेला केली सूचना

इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) पुढील सत्रासाठी १९ डिसेंबरला कोलकाता येथे खेळाडूंची लिलाव प्रक्रिया पार पडणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2019 04:45 AM2019-11-28T04:45:33+5:302019-11-28T04:46:01+5:30

whatsapp join usJoin us
Release me from the team, Dhoni suggests CSK | मला संघातून रिलिज करा, धोनीने सीएसकेला केली सूचना

मला संघातून रिलिज करा, धोनीने सीएसकेला केली सूचना

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबई : इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) पुढील सत्रासाठी १९ डिसेंबरला कोलकाता येथे खेळाडूंची लिलाव प्रक्रिया पार पडणार आहे. मात्र, त्या आधीच सर्वांचे लक्ष लागले आहे, ते आयपीएलच्या २०२१ सालच्या सत्रासाठी होणाऱ्या लिलावाकडे. कारण ‘२०२१ सालच्या लिलाव प्रक्रियेसाठी मला संघातून रिलिज करा आणि माझ्यावरही बोली लागू द्या,’ अशी सूचना भारताचा माजी कर्णधार आणि स्टार क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनी याने चेन्नई सुपरकिंग्ज (सीएसके) संघाला केली आहे. त्यामुळेच आत्तापासूनच २०२१ सालच्या आयपीएल लिलावाची उत्सुकता सर्वांना लागली आहे.

पुढील वर्षी नोव्हेंबर किंवा डिसेंबर महिन्यात २०२१ सालच्या आयपीएलसाठी लिलाव प्रक्रिया पार पडेल. खुद्द धोनीच्या सांगण्यावरूनच सीएसके धोनीला रिलिज करणार असल्याने या लिलावासाठी महेंद्रसिंग धोनीही उपलब्ध राहणार असल्याने, आतापासूनच सर्व फ्रेंचाइजींमध्ये उत्साह पाहण्यास मिळत आहे. तीन वेळा सीएसकेला आयपीएल चॅम्पियन बनविणाºया धोनीला सोडण्याची इच्छा सीएसकेची नाही. मात्र, धोनीचा आग्रह युवा खेळाडूंना संघात घेण्याबाबत असल्याने, सीएसकेला इच्छा नसतानाही हा निर्णय घ्यावा लागणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. आयपीएलमध्ये सर्वाधिक रक्कम मिळणाºया निवडक खेळाडूंमध्ये धोनीचा समावेश आहे. सीएसकेने अनेक वेळा धोनीला संघात कायम ठेवले असून, यासाठी त्याला सीएसकेने भलीमोठी रक्कमही दिली आहे. जर धोनी पुढील लिलाव प्रक्रियेत सहभागी झाला, तर त्याची मूळ किंमत २ करोड असेल.

मला रिटेन करु नका !
मिळालेल्या माहितीनुसार, २०२१ सालच्या आयपीएलपूर्वी होणा-या लिलाव प्रक्रियेत मला कोणत्याही किमतीमध्ये रिटेन करू नका, असे धोनीने सीएसकेला कळविले आहे. या प्रक्रियेत आपल्यावरही बोली लागावी, अशी धोनीची इच्छा आहे. दरम्यान, ‘राइट टू मॅच’ कार्डच्या जोरावर सीएसके पुन्हा एकदा धोनीला निवडू शकतात. त्यामुळेच या सीएसके संघ काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Release me from the team, Dhoni suggests CSK

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.