RCB vs MI Latest News : सूर्यकुमारची निवड समितीला चपराक; मुंबई इंडियन्सचा Play Off प्रवेश पक्का

RCB vs MI Latest News & Live Score : इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2020) १३व्या पर्वातील प्ले ऑफमधील पहिला संघ आज निश्चित झाला.

By स्वदेश घाणेकर | Published: October 28, 2020 11:02 PM2020-10-28T23:02:12+5:302020-10-28T23:06:56+5:30

whatsapp join usJoin us
RCB vs MI Latest News : Suryakumar Yadav 79* off 43 ball, MI beat RCB by 5 wickets; Qualify for Play off IPL 2020 | RCB vs MI Latest News : सूर्यकुमारची निवड समितीला चपराक; मुंबई इंडियन्सचा Play Off प्रवेश पक्का

RCB vs MI Latest News : सूर्यकुमारची निवड समितीला चपराक; मुंबई इंडियन्सचा Play Off प्रवेश पक्का

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

RCB vs MI Latest News & Live Score : इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2020) १३व्या पर्वातील प्ले ऑफमधील पहिला संघ आज निश्चित झाला. मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians)नं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( Royal Challengers Bangalore) संघावर सहज विजय मिळवून १६ गुणांसह प्ले ऑफमधील प्रवेश पक्का केला. सूर्यकुमार यादवनं चौकार-षटकारांची आतषबाजी केली.  त्यानं अर्धशतकाचं सेलिब्रेशन न करता RCBचा कर्णधार विराट कोहली याला टशन दिलं. ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी निवडण्यात आलेल्या टीम इंडियात स्थान न मिळाल्याचा राग सूर्यकुमारनं या सामन्यात काढला. यादवच्या या फटकेबाजीच्या जोरावर मुंबई इंडियन्सनं सहज विजय मिळवला. 

जोश फिलिफ आणि देवदत्त पडीक्कल यांनी RCBला सावध सुरुवात करून दिली. IPL 2020 मध्ये पहिलाच सामना खेळणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या जोश फिलिफनं २४ चेंडूंत ४ चौकार व १ षटकार खेचून ३३ धावा केल्या. कर्णधार विराट कोहली ( ९), एबी डिव्हिलियर्स ( १५) आणि शिवम दुबे ( २) अपयशी ठरले. देवदत्त ४५ चेंडूंत १२ चौकार व १ षटकार मारून ७४ धावांवर माघारी परतला. मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांनी दमदार कमबॅक करताना RCBला २० षटकांत ६ बाद १६४ धावांवर समाधान मानण्यास भाग पाडले.

प्रत्युत्तरात इशान किशन आणि क्विंटन डी'कॉक यांना मुंबई इंडियन्सला शानदार सुरुवात करून देता आली नाही. धावफलकावर ३७ धावा असताना क्विंटन ( १८) मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीवर माघारी परतला. युझवेंद्र चहलनं MIच्या दुसऱ्या सलामीवीराला बाद केले. इशान किशन २५ धावांवर बाद झाला. फलंदाजीत कमाल दाखवणाऱ्या देवदत्तनं क्षेत्ररक्षणातही अफलातून झेल टिपला. सौरभ तिवारीला ( ५) मोहम्मद सिराजनं बाद केलं. सूर्यकुमार यादव आणि कृणाल पांड्या यांनी मुंबई इंडियन्सच्या डावाला आकार देण्याचा प्रयत्न केला, परंतु चहलनं त्यांची ३५ धावांची भागीदारी संपुष्टात आणली. यादवनं २९ चेंडूंत अर्धशतक झळकावून टीम इंडियाच्या निवड समितीला जणू चपराक मारली.  

हार्दिक पांड्या आणि सूर्यकुमार यांनी पाचव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करून मुंबई इंडियन्सला विजयाच्या उंबरठ्यावर आणले. हार्दिक १७ ( २ षटकार) धावांवर माघारी परतला. ७ चेंडू ७ धावांची गरज असताना किरॉन पोलार्डनं पहिल्याच चेंडूवर चौकार खेचला. सूर्यकुमारनं नंतर अखेरच्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर चौकार खेचून मुंबईचा विजय पक्का केला. सूर्यकुमार ४३ चेंडूंत १० चौकार व ३ षटकारांसह ७९ धावांवर नाबाद राहिला. मुंबईनं १९.१ षटकांत ५ बाद १६६ धावा करून विजय पक्का केला. 


 

Web Title: RCB vs MI Latest News : Suryakumar Yadav 79* off 43 ball, MI beat RCB by 5 wickets; Qualify for Play off IPL 2020

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.