RCB vs DC Latest News : दिल्ली-बंगळुरू यांच्यात हरणारा संघही ठरू शकतो Playoffsसाठी पात्र; जाणून घ्या गणित!

इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2020) १३व्या पर्वात आतापर्यंत मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians) हा एकमेव संघ प्ले ऑफसाठी पात्र ठरला आहे. MIनं १८ गुणांसह अव्वल स्थान पक्कं केलं आहे. चेन्नई सुपर किंग्स, किंग्स इलेव्हन पंजाब आणि राजस्थान रॉयल्स यांचे आव्हान संपुष्टात आले आहेत.

By स्वदेश घाणेकर | Published: November 2, 2020 03:52 PM2020-11-02T15:52:58+5:302020-11-02T15:59:07+5:30

whatsapp join usJoin us
RCB vs DC Latest News : How both Royal Challengers Bangalore and Delhi Capitals can qualify for IPL 2020 playoffs | RCB vs DC Latest News : दिल्ली-बंगळुरू यांच्यात हरणारा संघही ठरू शकतो Playoffsसाठी पात्र; जाणून घ्या गणित!

RCB vs DC Latest News : दिल्ली-बंगळुरू यांच्यात हरणारा संघही ठरू शकतो Playoffsसाठी पात्र; जाणून घ्या गणित!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2020) १३व्या पर्वात आतापर्यंत मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians) हा एकमेव संघ प्ले ऑफसाठी पात्र ठरला आहे. MIनं १८ गुणांसह अव्वल स्थान पक्कं केलं आहे. चेन्नई सुपर किंग्स, किंग्स इलेव्हन पंजाब आणि राजस्थान रॉयल्स यांचे आव्हान संपुष्टात आले आहेत. आता उर्वरित तीन जागांचा निर्णय आजच्या आणि उद्याच्या लढतीनंतर होईल. पण, उर्वरित दोन सामन्यांमध्ये मुंबई इंडियन्स वगळता अन्य तीन संघांना एखादी चूक महागात पडू शकते. त्यात आज दिल्ली कॅपिटल्स ( Delhi Capitals ) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( Royal Challengers Bangalore) यांच्यातल्या सामन्यातील विजेता प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का करेल. पण, पराभूत होणारा संघही आपलं स्थान कायम राखू शकेल आणि त्यासाठी एक गणित जुळवावे लागेल.

DC, RCBसह कोलकाता नाईट रायडर्स ( Kolkata Knight Riders) आणि सनरायझर्स हैदराबाद ( Sunrisers Hyderabad) हेही शर्यतीत आहेत. SRH वगळता तीनही संघ १४ गुणांसह शर्यतीत जरा आघाडीवर आहेत, परंतु हैदराबादचा एक सामना शिल्लक आहे आणि हा त्यांच्यासाठी मोठा अडव्हांटेज आहे. त्यात हैदराबादचा नेट रन रेट हा +०.५५५ असा आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्सविरुद्ध त्यांनी विजय मिळवल्यास DC, RCB व KKRयापैकी एक संघ बाहेर फेकला जाऊ शकतो. आजच्या सामन्यात विजय मिळवून DC किंवा RCB स्वतःला सेफ करू शकतात. पराभूत संघालाही स्वतःला सेफ ठेवण्याची संधी आहे. अशात KKRला गाशा गुंडाळावा लागला जाऊ शकतो.

RCB व DC यांनी प्रत्येकी १३ सामन्यांत १४ गुणांची कमाई केली आहे आणि त्यांचा नेट रन रेट हा अनुक्रमे -०.१४५ व -०.१५९ असा आहे. KKR १४ सामन्यांत १४ गुणांसह -०.२१४ नेट रन रेटसह चौथ्या क्रमांकावर आहेत. RCB Vs DC यांच्यातील पराभूत होणाऱ्या संघाला मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील निकालाची प्रतीक्षा करावी लागेल. MIनं अखेरच्या सामन्यात SRHला पराभूत केल्यास प्ले ऑफचं चित्र स्पष्टच होईल. KKR चौथ्या स्थानासह प्ले ऑफमध्ये प्रवेश करेल.

पण, जर SRHनं MIला धक्का दिल्यास चित्र बदलेल. त्यात सर्वोत्तम नेट रन रेटच्या जोरावर SRH थेट पात्र ठरेल आणि KKR बाहेर फेकला जाईल. पण, आजच्या सामन्यात DC किंवा RCB यांच्यातील संघ मोठ्या फरकानं हरल्यास KKRला फायदा होऊ शकतो.  त्यामुळे आजच्या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण हा पर्याय दोन्ही संघ निवडतील. जर त्यांना १६१ धावांचा पाठलाग करावा लागेल, तर RCBला २१ आणि DC ला १८ धावांनी पराभवही चालू शकतो. त्यापेक्षा अधिक धावांनी पराभव RCB/DC यांच्यासाठी धोक्याचा ठरू शकतो.

Web Title: RCB vs DC Latest News : How both Royal Challengers Bangalore and Delhi Capitals can qualify for IPL 2020 playoffs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.