हार्दिक पांड्याचा 8 वर्षांपूर्वीचा व्हिडीओ होतोय व्हायरल, पण का?

भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या सध्या क्रिकेटपासून दूर आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2019 01:27 PM2019-08-22T13:27:55+5:302019-08-22T13:29:36+5:30

whatsapp join usJoin us
RARE VIDEO of Hardik Pandya; when 17-year-old Hardik smashing the spinner in 2010 during the Anand Premier League in Gujarat | हार्दिक पांड्याचा 8 वर्षांपूर्वीचा व्हिडीओ होतोय व्हायरल, पण का?

हार्दिक पांड्याचा 8 वर्षांपूर्वीचा व्हिडीओ होतोय व्हायरल, पण का?

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबई : भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या सध्या क्रिकेटपासून दूर आहे. इंग्लंडमध्ये झालेल्या वर्ल्ड कप स्पर्धेत पांड्याला दुखापत झाली होती आणि त्यातून सावरण्यासाठी त्याला विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळेच वेस्ट इंडिज दौऱ्यातील भारतीय संघात त्याला संधी दिलेली नाही. दक्षिण आफ्रिकेच्या भारत दौऱ्यात पांड्या टीम इंडियात पुनरागमन करण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्यासाठी तो कसून सरावही करत आहे. पण, फावल्या वेळात तो बेबी सिटिंग पासून ते रॅम्प वॉक करण्याची संधी सोडत नाही. पण, पांड्या सध्या सोशल मीडियावर एका व्हिडीओमुळे चर्चेत आला आहे. 

हार्दिक पांड्याचे बॉलिवूड अभिनेत्रीसोबत रॅम्प वॉक, कोण आहे ती?

2016 साली ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ट्वेंटी-20 मालिकेतून पांड्याने टीम इंडियात पदार्पण केले. त्यानंतर वन डे आणि कसोटी संघातही त्यानं आपलं स्थान पक्के केले. फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही विभागात पांड्याने योगदान दिले आहे आणि अल्पावधीतच तो संघाचा प्रमुख खेळाडू बनला आहे. आक्रमक फलंदाज म्हणून पांड्याची ओळख असल्याने त्याची फटकेबाजी पाहण्याचा मोह कोणालाही आवरत नाही. त्यामुळेच ट्वेंटी-20, वन डे आणि कसोटीतही त्यानं फटकेबाजीच करावी अशी सर्वांची इच्छा असते. वर्ल्ड कप स्पर्धेत त्याची बॅट तळपली नाही. पण, आगामी मालिकांमध्ये त्याचा तो आक्रमक फॉर्म पाहायला मिळेल अशी अपेक्षा आहे.

रिषभ पंतचा 'बेबी सिटर' टॅग आता हार्दिक पांड्याला, जाणून घ्या कारण

पांड्याने 11 कसोटी, 54 वन डे आणि 38 ट्वेंटी-20 सामन्यांत भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. कसोटीत त्याच्या नावावर 532 धावा आहेत. त्यात एक शतक व 4 अर्धशतकांचा समावेश आहे. गोलंदाजीतही त्याने 17 विकेट्स टिपल्या आहेत. वन डे क्रिकेटमध्ये त्याने 957 धावा आणि 54 विकेट्स, तर ट्वेंटी-20त 296 धावा व 36 विकेट्स घेतल्या आहेत. पांड्या नैसर्गिकच आक्रमक फलंदाज आहे. त्याची साक्ष देणारा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. गुजरात येथील स्थानिक क्रिकेट स्पर्धेत पांड्या अक्षरशः प्रतिस्पर्धी गोलंदाजांच्या गोलंदाजीच्या चिंधड्या उडवताना पाहायला मिळत आहे. 

हार्दिक-कृणाल पांड्या यांची नवी कोरी कार; पाहा फोटो

पांड्या बंधुंचा शायराना अंदाज; हार्दिक-कृणाल यांना सतावतोय हा प्रश्न!

पाहा व्हिडीओ...


 

Web Title: RARE VIDEO of Hardik Pandya; when 17-year-old Hardik smashing the spinner in 2010 during the Anand Premier League in Gujarat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.