Qualifier 2, DC vs SRH : दिल्ली कॅपिटल्स प्रथमच IPL फायनलमध्ये, जेतेपदासाठी मुंबई इंडियन्सशी भिडणार

Qualifier 2, DC vs SRH : Indian Premier League ( IPL 2020)च्या १३व्या पर्वात सातत्यपूर्ण कामगिरी करून प्ले ऑफमध्ये प्रवेश करणाऱ्या सनरायझर्स हैदराबाद ( Sunrisers Hyderabad) संघानं क्वालिफायर २ सामन्यात दिल्ली कॅपिटल्स ( Delhi Capitals) विरुद्ध सर्वांना निराश केलं.

By स्वदेश घाणेकर | Published: November 8, 2020 11:16 PM2020-11-08T23:16:11+5:302020-11-08T23:26:29+5:30

whatsapp join usJoin us
Qualifier 2, DC vs SRH : Delhi Capitals has qualified into the final for the first time ever in IPL history, They beat SRH by 17 runs | Qualifier 2, DC vs SRH : दिल्ली कॅपिटल्स प्रथमच IPL फायनलमध्ये, जेतेपदासाठी मुंबई इंडियन्सशी भिडणार

Qualifier 2, DC vs SRH : दिल्ली कॅपिटल्स प्रथमच IPL फायनलमध्ये, जेतेपदासाठी मुंबई इंडियन्सशी भिडणार

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Indian Premier League ( IPL 2020)च्या १३व्या पर्वात सातत्यपूर्ण कामगिरी करून प्ले ऑफमध्ये प्रवेश करणाऱ्या सनरायझर्स हैदराबाद ( Sunrisers Hyderabad) संघानं क्वालिफायर २ सामन्यात दिल्ली कॅपिटल्स ( Delhi Capitals) विरुद्ध सर्वांना निराश केलं. गोलंदाजी, क्षेत्ररक्षण व फलंदाजी या तीनही आघाड्यांवर SRHचे खेळाडू अपयशी ठरले. याउलट आज DCचा खेळ उजवा झाला. शिखर धवन, मार्कस स्टॉयनिस, शिमरोन हेटमायर यांच्यानंतर कागिसो रबाडा, स्टॉयनिस यांनी गोलंदाजीत आपली छाप पाडताना DCला पहिल्यांदा फायनलमध्ये प्रवेश मिळवून दिला. केन विलियम्सन व अब्दुल समद यांनी संघर्ष करताना सामन्यातील चुरस कायम राखली होती, परंतु त्यांना अपयश आलं. 

दिल्ली कॅपिटल्सनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पृथ्वी शॉच्या जागी संघात अजिंक्य रहाणेला संधी दिली. पृथ्वीच्या अनुपस्थितीत अजिंक्य व शिखर धवन हे सलामीला येतील अशी अपेक्षा होती, परंतु कर्णधार श्रेयस अय्यरनं गब्बरसह सलामीला मार्कस स्टॉयनिसला पाठवून मोठा डाव खेळला. DCची ही खेळी यशस्वी ठरली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी ८६ धावा चोपल्या. राशिद खाननं SRHला पहिलं यश मिळवून दिलं. स्टॉयनिस ३८ धावांवर त्रिफळाचीत झाला. पण, धवन दुसऱ्या बाजूनं दमदार खेळ सुरूच ठेवला. त्यानं २६ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केलं. चांगल्या सुरुवातीमुळे दिल्ली कॅपिटल्सच्या अन्य फलंदाजांचाही आत्मविश्वास उंचावलेला दिसला. 

अय्यर-धवन जोडीनं दुसऱ्या विकेटसाठी ४० धावा जोडल्या. जेसन होल्डरनं ही जोडी तोडली. अय्यर २१ धावांवर माघारी परतला. आज हैदराबादच्या खेळांडूकडून क्षेत्ररक्षणातही चुका झाल्या. त्याचाच फायदा आज दिल्लीच्या फलंदाजांनी पुरेपूर उचलला. विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला हादरवून सोडणाऱ्या जेसन होल्डरचीही DCनं धुलाई केली. बढती मिळालेल्या शिमरोन हेटमायरनंही चांगले हात धुऊन घेतले. होल्डरच्या चार षटकांत DCच्या फलंदाजांनी ५० धावा कुटल्या. संदीप शर्मानं १९व्या षटकात धवनला ( ७८ धावा, ६ चौकार व २ षटकार) बाद केले. त्यानं हेटमायरसह तिसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. हेटमायर २२ चेंडूंत ४२ धावांवर नाबाद राहिला. दिल्लीनं ३ बाद १८९ धावा केल्या. 

आज SRHची सर्वच बाजूनं कोंडी झाली. कागिसो रबाडानं दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर डेव्हिड वॉर्नरचा त्रिफळा उडवून DCला मोठं यश मिळवून दिलं. प्रियाम गर्ग व मनीष पांडे यांनी थोडावेळ खिंड लढवली, परंतु स्टॉयनिसनं या दोघांना एकाच षटकात बाद करून SRHची अवस्था ३ बाद ४४ धावा अशी केली. एलिमिनेटर सामन्यातील जबरदस्त जोडी केन विलियम्सन व जेसन होल्डर याही सामन्यात SRHला तारतील असे वाटले होते, परंतु अक्षर पटेलनं त्यांना धक्का दिला. होल्डर 11 धावांवर माघारी परतला. पण, केनला रोखणं दिल्लीला शक्य झाले नाही. आतापर्यंत SRHसाठी अनेकदा तारणहार ठरलेल्या केननं आणखी एक अर्धशतकी खेळी करताना सामन्यातील रंगत कायम ठेवली होती. त्यानं अब्दुल समदला सोबतीला घेऊन 27 चेंडूंत अर्धशतकी भागीदारी केली. 



अखेरच्या 24 चेंडूंत विजयासाठी 51 धावा SRHला हव्या होत्या. मार्कस स्टॉयनिसनं पुन्हा एकदा सामना दिल्लीच्या पारड्यात टाकले. त्यानं खतरनाक केनला बाद केलं. केन 45 चेंडूंत 67 ( 5 चौकार व 4 षटकार) धावा करून माघारी परतला. केनसोबत SRHचे आव्हानही संपुष्टात आल्याचे दिसले. समदनं 15 चेंडूंत 33 धावांची खेळी करताना SRHच्या आशा जीवंत ठेवल्या होत्या, परंतु कागिसो रबाडानं त्याला बाद केलं. पुढच्याच चेंडूवर राशिद खानलाही ( 11) बाद केले. 19व्या षटकात रबाडानं SRHच्या तीन फलंदाजानं माघारी पाठवले. रबाडानं 4 षटकांत 29 धावा देत 4 विकेट्स घेतल्या आणि पर्पल कॅप स्वतःकडे आणली. दिल्लीनं हा सामना 17 धावांनी जिंकला. हैदराबादला 20 षटकांत 8 बाद 172 धावा करता आल्या. 

Web Title: Qualifier 2, DC vs SRH : Delhi Capitals has qualified into the final for the first time ever in IPL history, They beat SRH by 17 runs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.