ऐतिहासिक दिवस-रात्र सामना पाहायला पंतप्रधान नरेंद्र मोदी जाणार; बीसीसीआयचे मोठे पाऊल

भारतासाठी हा सामना ऐतिहासिक असणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2019 03:43 PM2019-10-30T15:43:16+5:302019-10-30T15:43:46+5:30

whatsapp join usJoin us
Prime Minister Narendra Modi will visit the historic day and night match; BCCI's big move | ऐतिहासिक दिवस-रात्र सामना पाहायला पंतप्रधान नरेंद्र मोदी जाणार; बीसीसीआयचे मोठे पाऊल

ऐतिहासिक दिवस-रात्र सामना पाहायला पंतप्रधान नरेंद्र मोदी जाणार; बीसीसीआयचे मोठे पाऊल

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबई : भारतामधील पहिलाच कसोटी सामना कोलकात्याच्या इडन गार्डन्स येथे होणार आहे. भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यामध्ये हा सामना होणार आहे. हा सामना पाहायला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जाणार असल्याची चर्चा रंगत आहे.

भारतासाठी हा सामना ऐतिहासिक असणार आहे. त्यामुळे या ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार होण्यासाठी सर्वच उत्सुक आहेत. या सामन्याला बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना उपस्थित राहणार आहे. बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी ही माहिती दिली आहे. आता मोदीदेखील या सामन्याला उपस्थित राहणार असल्याचे समजत आहे. कारण बीसीसीआयने हा सामना पाहण्यासाठी पंदप्रधान नरेंद्र मोदी आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना आमंत्रण पाठवले आहे. या आमंत्रणाला आता मान देऊन मोदी सामना पाहायला येतात का, हे पाहणे उत्सुकतेचे असेल.

भारतामध्ये पहिल्यांदाच दिवस-रात्र कसोटी सामना खेळवण्यात येणार आहे. हा सामना कोलकात्याच्या इडन गार्डन्सवर होणार आहे. हा सामना दिवस-रात्र असल्यामुळे या लढतीच्या तिकीटी महाग असतील, असे चाहत्यांना वाटत आहे. त्यामुळे बंगाल क्रिकेट असोसिएशनने या सामन्याच्या तिकिटांचे दर किती ठेवले आहेत, याबद्दल चाहत्यांना उत्सुकता आहे.

भारत आणि बांगलादेश यांच्यातील कोलकात्यामध्ये होणारा कसोटी सामना दिवस-रात्र खेळवण्यात येणार आहे. या स्टेडियमची क्षमता 68 हजार आहे. भारतातील सर्वात मोठे स्टेडियम म्हणून ईडन गार्डन्सचे नाव घेतले जाते. पण आता पहिल्याच दिवस-रात्र कसोटीला चाहत्यांचा कसा प्रतिसाद मिळतो, याची उत्सुकता सर्वांनाच आहे. त्यामुळे बंगाल क्रिकेट असोसिएशनने या सामन्याचे दर फारच कमी ठेवले आहेत. या सामन्याची कमीत कमी 50 रुपयांमध्ये तिकिट मिळू शकते. बंगाल क्रिकेट असोसिएशनचे सचिव अभिषेक दालमिया यांनी ही माहिती दिली.

दालमिया म्हणाले की," आम्ही 2.30 वाजता नाही तर 1.30 ला सामना सुरु करणार आहोत. त्यामुळे हा सामना 8.30 ला संपू शकेल. चाहत्यांनी लवकर घरी जाण्यासाठी आम्ही हे पाऊल उचलले आहे. या सामन्याचे तिकीट दर 50, 100, 150 रुपये असे ठेवण्यात आले आहेत. 

भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील ट्वेंटी-20 मालिकेला 3 नोव्हेंबरपासून सुरुवात होत आहे. तीन ट्वेंटी-20 सामन्यांच्या मालिकेनंतर भारत आणि बांगलादेश यांच्यात दोन कसोटी सामने होणार आहेत. पहिला कसोटी सामना इंदूर येथे, तर दुसरा सामना कोलकाताच्या ऐतिहासिक इडन गार्डनवर खेळवला जाणार आहे. या कसोटीबाबत टीम इंडियानं मोठा निर्णय घेतला आहे आणि आता त्याला बांगलादेश क्रिकेट मंडळाकडूनही सहमती मिळाली आहे. त्यामुळे टीम इंडियासाठी कोलकाता कसोटी ऐतिहासिक ठरणार आहे. 

भारताचा कसोटी संघ - विराट कोहली, रोहित शर्मा, मयांक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, वृद्धीमान साहा ( यष्टिरक्षक), रवींद्र जडेजा, आर अश्विन, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, उमेश यादव, इशांत शर्मा, शुबमन गिल, रिषभ पंत. 

14 ते 18 नोव्हेंबर - पहिली कसोटी, इंदूर
22 ते 26 नोव्हेंबर - दुसरी कसोटी, कोलकाता

Web Title: Prime Minister Narendra Modi will visit the historic day and night match; BCCI's big move

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.