कोरोनामुळे नोकरी गेली अन् एकेकाळी सौरव गांगुलीला गोलंदाजी करणाऱ्या खेळाडूवर डाळ पुरी विकण्याची वेळ आली!

जगातील सर्वात श्रीमंत संघटना म्हणून बीसीसीआयची ओळख आहे. कोरोना संकटातही बीसीसीआयनं २०२०मध्ये ३ हजाराहून अधिक कोटी रुपयांची कमाई केली. पण...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2021 03:16 PM2021-07-07T15:16:44+5:302021-07-07T15:18:56+5:30

whatsapp join usJoin us
Prakash Bhagat, who once bowled to Sourav Ganguly, is selling 'dal puri' to make ends meet in Assam | कोरोनामुळे नोकरी गेली अन् एकेकाळी सौरव गांगुलीला गोलंदाजी करणाऱ्या खेळाडूवर डाळ पुरी विकण्याची वेळ आली!

कोरोनामुळे नोकरी गेली अन् एकेकाळी सौरव गांगुलीला गोलंदाजी करणाऱ्या खेळाडूवर डाळ पुरी विकण्याची वेळ आली!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

जगातील सर्वात श्रीमंत संघटना म्हणून बीसीसीआयची ओळख आहे. कोरोना संकटातही बीसीसीआयनं २०२०मध्ये ३ हजाराहून अधिक कोटी रुपयांची कमाई केली. पण, या कोरोना संकटात स्थानिक क्रिकेट स्पर्धा रद्द झाल्यामुळे अनेकांवर आर्थिक संकटही ओढावले. बीसीसीआयनं २०२१-२२च्या स्थानिक क्रिकेट स्पर्धांची घोषणा नुकतीच केली, पण त्याला मुळ स्वरूप येण्यास सप्टेंबर महिना उजाडावा लागेल. पण मागील दीड वर्ष स्थानिक क्रिकेटपटूंचा आर्थिक संकटाशी मुकाबला सुरूच आहे. असाच एक संघर्ष माजी रणजीपटू प्रकाश भगत याचा सुरू आहे. एकेकाळी सौरव गांगुलीला राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत गोलंदाजी करणाऱ्या या खेळाडूला आसामच्या सिलचर येथे डाळ पुरी विकावी लागत आहे. ( Former Indian domestic cricketer and ex-Ranji star Prakash Bhagat is reportedly running a food stall to make ends meet amid these testing times) 

आसामकडून रणजी ट्रॉफीत खेळणारा प्रकाश भगत याला कुटुंबाचा गाढा हाकण्यासाठी डाळ पूरी विकावी लागत आहे. भगतनं राज्य संघाकडून विविध राष्ट्रीय आणि राज्य स्तरावरील स्पर्धेत भाग घेतला होता. २००९-१० मध्ये तो आसामकडून रणजी ट्रॉफीत तर २०१०-११ मध्ये रेल्वे आणि जम्मू-काश्मीरकडून खेळला होता. IANS नं दिलेल्या वृत्तानुसार, आर्थिक संकटात कुटुंबाला सांभाळण्यासाठी तो दक्षिण आसाम येथील सिलचरमध्ये डाळ पुरीची गाडी लावतो. बंगळुरू येथील NCAमध्ये त्याला बोलावणं आलं होतं, तेव्हा त्याच्याकडे उदयोन्मुख खेळाडू म्हणून पाहिले जात होते. २००३ साली त्यानं नेट्समध्ये गांगुलीला गोलंदाजी केली. तेथेच तो सचिन तेंडुलकर, झहीर खान, हरभजन सिंग आणि वीरेंद्र सेहवाग यांनाही भेटला होता.

''वयाच्या ६५व्या वर्षी वडिलांना हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं अन् मी  २०११ला क्रिकेट खेळणं सोडलं. माझे वडील व भाऊ चाट फूड विकायचे. वडिलांच्या निधनानंतर भावाचीही प्रकृती खालावली आहे,''असे भगतने सांगितले. 
भगत याच्यावर पत्नी व दोन मुलांचीही जबाबदारी आहे. १९९९ मध्ये त्याच्या क्रिकेट कारकीर्दिला सुरुवात झाली. त्यानं सिलचर जिल्हा संघटनेच्या १३ वर्षांखालील संघाचे प्रतिनिधित्व केले. त्यानंतर त्यानं १६, १९ व २३ वर्षांखालील संघाचे राज्य व राष्ट्रीय स्थरावर प्रतिनिधित्व केले. तो मोबाईलच्या दुकानातही कामाला लागला होता, परंतु कोरोनामुळे त्याची नोकरी गेली.

''कामगिरीच्या जोरावर मी आसामच्या रणजी संघात स्थान पटकावले. सय्यद मुश्ताक आली ट्रॉफीसाठी निवडलेल्या संघातही मी होतो. अनेक माजी क्रिकेटपटूंना सरकारी नोकरी किंवा आर्थिक मदत मिळाली. पण, माझ्या नशीबी तेही नाही,''असे भगतने सांगितले.


 

Web Title: Prakash Bhagat, who once bowled to Sourav Ganguly, is selling 'dal puri' to make ends meet in Assam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.