सर तुम्ही गरजेपेक्षा अधिक ‘social distance' पाळताय; पंतप्रधानांच्या 'त्या' फोटोवर आनंद महिंद्रा यांचं मजेशीर ट्विट

India vs England, 2nd Test : भारतविरुद्ध इंग्लंड यांच्यातला दुसरा कसोटी सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर सुरू आहे. PM Narendra Modi Keeping an Eye at Chepauk

By स्वदेश घाणेकर | Published: February 14, 2021 04:05 PM2021-02-14T16:05:31+5:302021-02-14T16:13:02+5:30

whatsapp join usJoin us
PM Narendra Modi Keeping an Eye at Chepauk, Anand Mahindra react on PM Tweet  | सर तुम्ही गरजेपेक्षा अधिक ‘social distance' पाळताय; पंतप्रधानांच्या 'त्या' फोटोवर आनंद महिंद्रा यांचं मजेशीर ट्विट

सर तुम्ही गरजेपेक्षा अधिक ‘social distance' पाळताय; पंतप्रधानांच्या 'त्या' फोटोवर आनंद महिंद्रा यांचं मजेशीर ट्विट

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs England, 2nd Test : भारतविरुद्ध इंग्लंड यांच्यातला दुसरा कसोटी सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर सुरू आहे. रोहित शर्माच्या १६१ धावा अन् अजिंक्य रहाणे व रिषभ पंत यांच्या अर्धशतकाच्या जोरावर टीम इंडियानं पहिल्या डावात ३२९ धावा केल्या. फिरकी गोलंदाजांना पोषक खेळपट्टीवर भारतीय खेळाडूंनी कमाल केली. इंग्लंडचा पहिला डाव १३४ धावांत गुंडाळून टीम इंडियानं पहिल्या डावात १९४ धावांची आघाडी घेतली आहे. या सामन्यात ५० टक्के प्रेक्षकांना स्टेडियमवर उपस्थित राहण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे टीम इंडियाला १२व्या खेळाडूचा पाठींबा मिळत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Narendra Modi) हेही  केरळ दौऱ्यावर आहेत आणि चिदंबरम स्टेडियमवच्या वरून विमानानं जात असताना त्यांनी हवाई फोटो टिपला आणि सोशल मीडियावर पोस्ट केला. त्यावर उद्योगपती आनंद महिंद्रा ( Anand Mahindra) यांनी भन्नाट प्रतिक्रिया दिली आहे.  आर अश्विन 'जगात भारी'; भारतीय गोलंदाजाच्या नावावर ऐतिहासिक विक्रम

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही चिदंबरम स्टेडियमचा हवाई फोटो काढला आणि सोशल मीडियावर पोस्ट केला. 


मोदींचं ते ट्विट रिट्विट करताना आनंद महिंद्रा यांनी लिहिलं की, सर तुम्ही रिंगसाईट सिटवरून हा सामना पाहताना गरजेपेक्षा अधिक सोशल डिस्टन्स पाळला आहे.''

 

Web Title: PM Narendra Modi Keeping an Eye at Chepauk, Anand Mahindra react on PM Tweet 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.