Leslie Hylton: संघाला पहिली कसोटी मालिका जिंकून दिली, मृत्युदंडाच्या शिक्षेने जीवनाची अखेर झाली, हा आहे फाशीची शिक्षा झालेला एकमेव क्रिकेटपटू

Leslie Hylton : क्रिकेटला सभ्य गृहस्थांचा खेळ म्हणून ओळखल जात असले तरी आतापर्यंत अनेक क्रिकेटपटूंवर गंभीर आरोप झालेले आहेत. तसेच काही क्रिकेटपटूंनी तुरुंगवासही भोगला आहे. मात्र क्रिकेटच्या इतिहासामध्ये असाही एक क्रिकेटपटू आहे ज्याला मृत्यूदंडाची शिक्षा झाली होती.

क्रिकेटला सभ्य गृहस्थांचा खेळ म्हणून ओळखल जात असले तरी आतापर्यंत अनेक क्रिकेटपटूंवर गंभीर आरोप झालेले आहेत. तसेच काही क्रिकेटपटूंनी तुरुंगवासही भोगला आहे. मात्र क्रिकेटच्या इतिहासामध्ये असाही एक क्रिकेटपटू आहे ज्याला मृत्यूदंडाची शिक्षा झाली होती.

या क्रिकेटपटूचे नाव आहे लेस्ली हिल्टन. वेस्ट इंडिजचे कसोटीपटू असलेले लेस्ली हे क्रिकेटच्या इतिहासातील आतापर्यंतचा एकमेव क्रिकेटपटू आहे ज्यांना हत्येप्रकरणी फाशी देण्यात आली होती. त्यांना १७ मे १९५५ रोजी फाशी देण्यात आली होती. त्यांना हा मृत्युदंड सुनावण्यामागचे कारण वाचून तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणारा नाही.

१९३४-३५ च्या हंगामात लेस्ली हिल्टन यांनी वेस्ट इंडीजकडून कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. इंग्लंडविरुद्ध झालेल्या या मालिकेतील पहिला सामना इंग्लंडने जिंकले होते. मात्र दुसऱ्या आणि तिसऱ्या सामन्यात विजय मिळवत वेस्ट इंडिजने ही मालिका जिंकली होती. या मालिकेत लेस्ली हिल्टन यांनी १३ बळी टिपत संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली होती. इंग्लंडचा हा पहिला कसोटी मालिकाविजय होता.

हिल्टन यांनी वेस्ट इंडीजकडून ६ कसोटी सामन्यांमध्ये १६ बळी मिळवले. तर ७० धावा काढल्या. तसेच एक झेल टिपला. तर ४० प्रथमश्रेणी सामन्यांत ८४३ धावा काढल्या आणि १२० बळी टिपले होते. १९३९ त्यांनी आपला शेवटचा कसोटी खेळली.

मात्र क्रिकेट कारकिर्दीनंतर त्याचे वैयक्तिक आयुष्य त्यांच्या जीवनात वादळ घेऊन आले. ते जमैकामधील इन्स्पेक्टरच्या मुलीच्या प्रेमात पडले. अनेक चढउतारानंतर त्यांनी लर्निन हिच्यासोबत १९४२ मध्ये लग्न केले. पाच वर्षांनंतर तयांना एक मुलगा झाला.

मात्र काही वर्षांनंतर त्यांच्या नात्यामध्ये कटुता येण्यास सुरुवात झाली. लर्लिन बिझनेसचे कारण देत वारंवार न्यूयॉर्कला जाऊ लागली. यादरम्यान, लेस्ली यांना एक निनावी पत्र मिळाले. त्यामध्ये लर्लिन हिचे ब्रुकलिन एव्हेन्यूमध्ये राहणाऱ्या रॉय फ्रान्सिस याच्याशी अनैतिक संबंध असल्याचा उल्लेख होता.

त्यामुळे लेस्ली यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. लर्लिनने पहिल्यांदा अनैतिक संबंधांची गोष्ट नाकारली. मात्र काही दिवसांतच लर्लिनने फ्रान्सिसला लिहिलेली पत्रे लेस्ली यांना मिळाली. तेव्हा दोघांत कडाक्याचे भांडण झाले. तसेच लर्लिनने फ्रान्सिससोबत अनैतिक संबंध असल्याचे स्वीकारले. तसेच तू माझ्या क्लासमधील नाही आहेस, तुझ्यासोबत मी खूश नाही. तुला पाहिल्यावर मी आजारी पडते, असे लेस्ली यांना सुनावले.

लर्लिनचे बोलणे ऐकून लेस्ली संतापले. त्यांनी खिडकीवर ठेवलेली बंदूक घेतली आणि लर्लिनवर सात गोळ्या झाडल्या. लर्लिन जागीच मृत्युमुखी पडली. त्यानंतर कोर्टात लेस्ली यांनी स्वत:वर गोळ्या झाडण्याचा प्रयत्न केला. मात्र चुकून पत्नीला गोळ्या लागल्याचा बचाव केला. मात्र त्यांचा बचाव कोर्टाने फेटाळला कारण लर्लिनच्या शरिरात सात गोळ्या सापडल्या होता.

अखेर २० ऑक्टोबर १९५४ रोली लेस्ली हिल्टनला दोषी ठरवून फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. त्यानंतर १७ मे १९५५ रोजी त्यांना फाशी देण्यात आली. फाशीची शिक्षा झालेले लेस्ली हे आतापर्यंतचे एकमेव क्रिकेटपटू आहेत.