हार्दिक पांड्याचं ५ कोटींचं घड्याळ; जाणून घ्या भारतीय क्रिकेटपटूंमध्ये कोणाच्या हातावर किती महागडं घड्याळ!

हार्दिक पांड्या सध्या आता वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे आणि ती चर्चा त्याच्या घड्याळामुळे रंगली आहे. हार्दिकनं सोशल मीडियावर त्याचे काही फोटो पोस्ट केले आहेत आणि त्यात त्यानं नव्या घड्याळाचाही फोटो पोस्ट केला आहे. या घड्याळाची किंमत वाचून सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. पण, भारतीय क्रिकेटपटूंमध्ये सर्वात महागडं घड्याळ कोण घालतं हे माहित्येय?

रोहित शर्माकडे Rolex Sky-Dweller हे १०.७ लाख किमतीचे घड्याळ आहे.

हार्दिकप्रमाणे लोकेश राहुलनंही Patek Philippe कंपनीचं घड्याळ खरेदी केलं आहे, परंतु त्याची किंमत ३७.५ लाख आहे.

कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनी Panerai Radiomir California कंपनीचं ९.२५ लाखांचं घड्याळ घालतो.

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली Rolex कंपनीचं ८ लाख ६०,७०० रुपयाचं घड्याळ घालतो.

हार्दिक पांड्यानं Patek Philippe Nautilus Platinum 5711 हे घड्याळ खरेदी केलं आहे आणि त्याची किंमत ही ५ कोटींहून अधिक आहे.

हार्दिक पांड्याचा भाऊ कृणाल हाही Rolex Cosmograph Daytona Rainbow Yellow Gold Oyster हे ९० लाखांचं घड्याल घालतो.

Read in English