विराट कोहलीचा भीमपराक्रम; बनला इंस्टाग्रामवर १५० मिलियन फॉलोअर्स असलेला आशियातील पहिला सेलिब्रिटी!

इंग्लंड-भारत चौथ्या कसोटीत उमेश यादवनं टीम इंडियाला सामन्यावर पकड मिळवून दिली आहे. दुसऱ्या दिवसाच्या पहिल्याच सत्रात काही षटकांतच उमेशनं इंग्लंडला दोन धक्के दिले. त्यामुळे कसोटी रंगतदार अवस्थेत आली आहे.

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली व शार्दूल ठाकूर यांच्या अर्धशतकांच्या जोरावर टीम इंडियानं पहिल्या डावात १९१ धावा केल्या आणि प्रत्युत्तरात इंग्लंडचा निम्मा संघ ६२ धावांवर माघारी परतला आले.

ओव्हलवर सुरू असलेल्या या सामन्यात विराटला पुन्हा एकदा शतकापासून दूर रहावे लागले असले तरी त्यानं एक अनोखं दीडशतक साजरं केलं आहे. असा पराक्रमक करणारा तो देशातीलच नव्हे तर आशियातील एकमेव व्यक्ती ठरला आहे.

विराट कोहलीनं सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. शुक्रवारी त्याच्या नावावर मोठा विक्रम रचला गेला. इंस्टाग्रामवर १५० मिलियन म्हणजेच १५ कोटी ०१ लाख १६,१४६ इतके फॉलोअर्स झाले आहेत.

संपूर्ण आशियात इतके फॉलोअर्स असलेला विराट हा पहिलाच सेलिब्रिटी आहे. ( Virat Kohli became the first cricketer, first Indian as well as the first Asian to cross the 150 million followers landmark on Instagram).

जगभरात १५० मिलियन इंस्टा फॉलोअर्स असलेला तो चौथा खेळाडू ठरला आहे. पोर्तुगालचा सुपरस्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो ( ३३७ मिलियन), अर्जेंटिनाचा लिओनेल मेस्सी ( २६० मिलियन) आणि ब्राझिलचा नेयमार ( १६० मिलियन) हे आघाडीवर आहेत.

वाढते फॉलोअर्स ही विराट कोहलीसाठी चांगली गोष्ट आहे. Hopper HQनं दिलेल्या माहितीनुसार इंस्टाग्रामवर सर्वाधिक कमाई करणाऱ्या देशातील सेलिब्रिटींमध्ये विराट अव्वल स्थानावर आहे.

इंस्टाग्रामवर एका स्पॉन्सर्ड पोस्टमागे तो ५ कोटी रुपये कमावतो. आता फॉलोअर्सचा आकडा वाडल्यानं त्याच्या मिळकतीतही वाढ होणार आहे. रोनाल्डो एका इंस्टा पोस्टमागे ११.७२ कोटी, मेस्सी ८.५४ कोटी आणि नेयमार ६ कोटी कमावतो.